नांदगावनंतर आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातही डमी उमेदवाराची एन्ट्री, डमी उमेदवाराला 20 लाख दिल्याचा गणेश गीतेंचा आरोप
नांदगावनंतर (Nandgaon) आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ( Nashik East Assembly Constituency) देखील डमी उमेदवाराची (Dummy Candidate) एन्ट्री झाली आहे.
Nashik East Assembly Constituency : नांदगावनंतर (Nandgaon) आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ( Nashik East Assembly Constituency) देखील डमी उमेदवाराची (Dummy Candidate) एन्ट्री झाली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते (Ganesh Geete) यांच्या विरोधात भाजपने डमी उमेदवार दिल्याचा आरोप गीते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. डमी उमेदवार उभा करण्यामागे मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध असल्याचा धक्कादायक दावा गीते यांनी केलाय. नांदगाव पाठोपाठ नाशिक पूर्व मतदारसंघात देखील उमेदवारावरून गदारोळ सुरु आहे.
डमी उमेदवाराला 20 लाख रुपये दिल्याचा आरोप
डमी उमेदवाराला 20 लाख रुपये दिल्याचा आरोप नाशिक पूर्व मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी केलाय. गणेश गीते यांच्या नावाने नाशिक पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी डमी उमेदवार दिल्याचा आरोप आहे. डमी उमेदवार उभे करण्यामागे आर्थिक हितसंबंध झाल्याची ऑडिओ क्लिप देखील गणेश गीते यांनी ऐकवली. विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी विकास काम केले असतील तर डमी उमेदवार का उभा केला? असा सवाल गणेश गीते यांनी केलाय. गणेश गीते यांच्याप्रमाणेच नाशिकमध्ये देखील ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याची माहिती गीते यांनी दिलीय.
नाशिक पूर्व मतदारसंघात रंगतदार लढत होणार
मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या गणेश गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार गटाकडून नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपानं त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर गणेश गीते हे तुतारी चिन्हावर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गीते अशी नाशिक पूर्व मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे. गणेश गीते यांनी भारतीय जनता पक्षाकडून नाशिक महानगरपालिकेत सलग दोन वेळा स्थायी समिती सभापती पद सांभाळले आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी गणेश गीते यांची ओळख आहे.
महत्वाच्या बातम्या: