एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : समीर भुजबळांनंतर अजितदादांच्या पक्षात दुसरी बंडखोरी, नाशिक मध्य विधानसभेतून बडा नेता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

Nashik Central Assembly Constituency : नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याने बंडखोरी केल्याने महायुतीचं टेन्शन वाढल्याचं दिसून येत आहे. 

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेर दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या पाठोपाठ अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याने बंडखोरी केल्याने महायुतीचं टेन्शन वाढल्याचं दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यासमोर समीर भुजबळ यांनी आव्हान निर्माण केले. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून आले. 

रंजन ठाकरेंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

या पाठोपाठ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रंजन ठाकरे हे अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. महायुतीने भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना उमेदवारी घोषित केली असताना रंजन ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर रंजन ठाकरेंच्या उमेदवारीने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने बंडखोरी केली आहे. रंजन ठाकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

दरम्यान, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गिते (Vasant Gite) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपक उमेदवारी अर्ज भरल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते.   

आणखी वाचा

Sujay Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manikarao Kokate Vs Chhagan Bhujbal | भुजबळ आणि कोकाटेंमधील नेमकं वैर काय? Special ReportMahayuti Seat Allocation:राज्य मंत्रिमंडळात कोणाचं डिमोशन? खातेवाटपाचं सखोल विश्लेषण! Special ReportGwalior Drone Story | माणवासह हवेत उडणारा ड्रोन तुम्ही पाहिलात का? Special ReportUddhav Thackeray VS Raj Thackeray | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget