(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महायुतीत फक्त 2 जागांचा तिढा, आज रात्री निर्णय होणार, बावनकुळेंची माहिती, 'त्या' 2 जागा कोणत्या?
महायुतीत (Mahayuti) जवळपास सगळ्या जागांचे वाटप झाले आहे, फक्त दोनच जागांवर तिढा कायम असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिली आहे.
Chandrasekhar Bawankule : महायुतीत (Mahayuti) जवळपास सगळ्या जागांचे वाटप झाले आहे, फक्त दोनच जागांवर तिढा कायम असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिली आहे. पण त्या दोन जागा कोणत्या हे सांगणार नाही असंही बावनकुळे म्हणाले. नांदेड लोकंसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आज ठरणार आहे. या ठिकाणी योग्य उमेदवार पक्ष देईल असेही बावनकुळे म्हणाले. चार नाव आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवली आहेत. त्यावर आजच निर्णय होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
जागा वाटपाचा निर्णय खेळीमेळीच्या वातावरणात
महायुतीत दोन जागांचा तिढा कायम आहे. त्या जागा कोणत्या हे मी सांगणार नाही असे बावनकुळे म्हणाले. याबाबत आज निर्णय होईल असेही बावनकुळे म्हणाले. आमचा जागा वाटपाचा निर्णय खेळीमेळीच्या वातावरणात झाला आहे. महायुतीची यादी आम्ही जिंकण्यासाठी केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
आम्ही सर्व एकत्रित बसू आमच्या कार्यकर्त्यांची समजूत घालू
दरम्यान, कार्यकर्त्याच्या भावना आहेत. काही जणांनी निवडणुकीसाठी अर्जही दाखल केले असतील. आम्ही सर्व एकत्रित बसू आमच्या कार्यकर्त्यांची समजूत घालू , सर्व कार्यकर्ते आपला अर्ज मागे घेतील असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला रविवारी म्हणजे आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा मिटणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महायुतीचा मुंबईसहित सर्व जागांचा तिढा मिटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महायुतीच्या किती जागा बाकी ?
भाजप
99 + 22 = 121
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
38 + 11 + 4 = 53
शिवसेना (शिंदे)
45 = 45
एकूण 288 - 215 = 73 बाकी
भाडपने आत्तापर्यंत आपल्या 121 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 53 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर शिवसेना शिंदे गटानं 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. म्हणजे महायुतीच्या एकूण 215 जागांवरील जागावाटप पूर्ण झालं आहे. अद्याप 73 ठिकाणचे जागावाटप बाकी आहे. यामध्ये कोणाकोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच यातील कोणते मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे देखील आज समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या: