(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: विधानसभा निवडणुकीतील मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी वाचण्यासाठी क्लिक करा.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. एकूण 288 मतदारसंघांपैकी 224 मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA Alliance) अवघ्या 58 जागांवर विजय मिळेल, असे दिसत आहे. हा मविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीमध्ये भाजप 133, शिंदे गटाला 56 आणि अजित पवार गटाला 39 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 19, काँग्रेसला 20 आणि शरद पवार गटाला अवघ्या 15 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, मुंबईतही महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मिळून एकूण 36 मतदारसंघ आहेत.
यामध्ये वरळीतील जागेवरुन आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. तर माहीममध्ये अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला. या मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. हा राज ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रचंड मोठा धक्का ठरला आहे. तर उद्धव ठाकरे यांनाही मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मोजके अपवाद वगळता ठाकरे गटातील मुंबईतील बहुतांश उमेदवारांचा पराभव झालेला आहे.
मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
* मलबार हिल विधानसभा मतदारसंघ-- मंगलप्रभात लोढा (भाजप)
* बोरिवली विधानसभा मतदारसंघ- संजय उपाध्याय (भाजप)
* वडाळा विधानसभा मतदारसंघ-- कालिदास कोळंबकर (भाजप)
* कुलाबा विधानसभा मतदारसंघ-- राहुल नार्वेकर (भाजप)
* वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ-- आशिष शेलार (भाजप)
* अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ-- मुरजी पटेल (भाजप)
* कांदिवली विधानसभा मतदारसंघ-- अतुल भातखळकर (भाजप)
* अणशुक्तीनगर विधानसभा मतदारसंघ-- सना मलिक (अजित पवार गट)
* माहीम विधानसभा मतदारसंघ- महेश सावंत (ठाकरे गट)
* दहिसर विधानसभा मतदारसंघ- मनीषा चौधरी (भाजप)
* वरळी विधानसभा मतदारसंघ- आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
* शिवडी विधानसभा मतदारसंघ- अजय चौधरी (ठाकरे गट)
* विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत (ठाकरे गट)
* शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ- अबू आझमी (समाजवादी पक्ष)
* कु्र्ला विधानसभा मतदारसंघ- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
* मुलुंड विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा (भाजप)
* भायखळा विधानसभा मतदारसंघ- मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
* चेंबूर विधानसभा मतदारसंघ- तुकाराम काते (शिंदे गट)
* कलिना विधानसभा मतदारसंघ-- संजय पोतनीस (ठाकरे गट)
* वर्सोवा विधानसभा मतदारसंघ-- हारुन खान (ठाकरे गट)
* जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ-- अनंत नर (ठाकरे गट)
* अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ-- अमित साटम (ठाकरे गट)
* मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ-- अमिन पटेल (काँग्रेस)
* वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
* मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ-- अस्लम शेख (काँग्रेस)
* दिंडोशी विधानसभा मतदारसंघ-- सुनील प्रभू (ठाकरे गट)
* गोरेगाव विधानसभा मतदारसंघ-- विद्या ठाकूर (भाजप)
* चारकोप विधानसभा मतदारसंघ-- योगेश सागर (भाजप)
* मागाठाणे विधानसभा मतदारसंघ-- प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
* घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ- राम कदम (भाजप)
* घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ- पराग शाह (भाजप)
* भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघ- अशोक पाटील (शिंदे गट)
* विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ- पराग अळवणी (भाजप)
* चांदिवली विधानसभा मतदारसंघ- दिलीप लांडे (शिंदे गट)
* सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ-- तमिळ सेल्वन (भाजप)
आणखी वाचा