ठाकरेंनी रायगड-मावळच्या पराभवाचा वचपा काढला अन् जयंत पाटलांचा पराभव झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Election Result 2024 : विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला.
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 : विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेकपच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता. पण जयंत पाटील यांना अपेक्षित मतेच मिळाली नाही. जंयत पाटील यांना पहिल्या पसंतीची फक्त 8 मते मिळाली. तर जयंत पाटलांच्या एकूण मतांची संख्या फक्त 12 इतकीच राहिली. पराभवानंतर जयंत पाटील संतप्त झाले होते. त्यांनी मतमोजणी सुरु असतानाचा काढता पाय घेतला. एकूण संख्याबळ पाहता महायुतीचे 9 आणि मविआचे दोन उमेदवार निवडून येतील, असाच अंदाज होता. पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चुरस वाढली. निकालानंतर मविआचे जंयत पाटील यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. जंयत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जयंत पाटलांचा पराभव केला, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ आणि रायगडमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा ठाकरेंनी काढल्याचा एक वेगळा सुरु उमटत आहे.
रायगड आणि मावळ मतदारसंघात जयंत पाटील यांची ताकद आहे. पण त्यांच्याकडून अपेक्षित मदत मविआला झाली नाही, त्यामुळेच ठाकरे आणि पवार यांनी जयंत पाटील यांचा पराभव करत वचपा काढल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. वेळेवर उबाठा गटाने दोस्तीत कुस्ती केली, गद्दारी केली आणि मिलिंद नार्वेकरांला उभं केलं शेवटी व्हायचं ते झालं, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यांनी दिली आहे.
जयंत पाटलांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. पाहूयात, कोण काय काय म्हणाले...
शेतकरी कामगार पक्षाला मानणारा रायगड भागात मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्याला मानणारी जवळपास लाखभर मते सुनील तटकरेंकडे फिरवल्याची चर्चा आहे. यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी मदत न करण्याचा निर्णय घेतला.
— Prashant Dhumal (@prash_dhumal) July 12, 2024
शेकापचे जयंत पाटील यांनी कायमच जातीयवादी पक्षाला विरोध केला. शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. १९९९ ते २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहिले. आज त्यांचा घात झाला.
— Prakash Patil (@iamprakashpatil) July 12, 2024
लोकसभा निवडणुकीत शेकापच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला.
जयंत पाटील यांनी लक्ष घालायला पाहिजे होते.
@PawarSpeaks यांच्या राजकिय विचारांत धोरणांत सातत्य नसतें असं सगळेचजण नेहमी बोलत असतात पण तें वास्तव नाही.
— Shrikant Joshi (Modi ka Parivar) (@Shrikan27402771) July 12, 2024
काकाश्रीं ज्याला पाठिंबा देतात त्याचा सत्यानाश करतात या त्यांच्या धोरणात सातत्य कायम आहे, पाहिजे तर शे.का.प.च्या जयंत पाटील यांना आज विचारून पहा.
शेकापचे जयंत पाटील आज विधानपरिषदेत पडले त्यामागे रायगडचा सुनील तटकरेंचा विजय जबाबदार आहे हे उघड गुपित आहे.
— Shr!kant DaphaL पाटील (@Shrikant_Daphal) July 12, 2024
😉
जयंत पाटील यांनी अलिबाग विधानसभा लढवावी आता...बघू तटकरे किती मदत करतात त्यांना, लोकसभेत आघाडीधर्म मोडून विश्र्वासघात केल्याची परतफेड म्हणून.
— Deepak Pansare (@Pansare15Deepak) July 12, 2024
विधीमंडळाची आयुधे उत्तम पद्धतीनें वापरणारे, दुर्लक्षित विषय पटलावर ठेवणारे शेकाप चे जयंत पाटील पडले. दुःखद.
— RajTfanclub (@rajbhakt16) July 12, 2024
उद्धव ठाकरे परिषदेचे आमदार, त्यांचा मुलगा आमदार आणि उद्धव ह्यांचा PA सुध्दा आमदार !
नार्वेकर ज्यांच्यासाठी जयंतरावांचा बळी घेतलाय. रायगड मधील पराभवाचा वचपा काढलाय.
महाविकास आघाडी वाले जाणून बुजून शेकाप उमेदवारांना हरणाऱ्या निवडणुकीत उभे करतात का…आधी बाळाराम पाटील आणि आता जयंत पाटील !! #रायगड #अलिबाग #शेकाप
— डॅडी बाला ठाकूर 🇮🇳🚩 (@veda_mulga) July 12, 2024
जयंत पाटील तुमचा करेक्ट कार्यक्रम केला करमातिकर साहेबांनी.
— चेतन 📈📉📊🇮🇳 🌳🌴🗨️ (@Chetanapmarathi) July 12, 2024
विधानसभेत संख्या बळ नसतानाही #विधानपरिषदनिवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले, त्याचा वचपा ठाकरे पवारांनी काढला
— Brijmohan Patil (@brizpatil) July 12, 2024
बिचारे गरीब आणि दिसायला साधे भोळे असणाऱ्या जयंत पाटील सारख्या वंचित उमेदवार यांच्या पाठीत प्रस्थापित आमदारांनी खंजीर खुपसला 🥺🥺😭
— प्रधान जी (@pradhanfulera) July 12, 2024
असेच चंद्रकांत हांडोरे सोबत झाले,
आज जयंत पाटिल साहेब यांच्या सोबत झाले#Racism #BlackLivesMatter
ह्या माणसाचा गेम केला राव शरद पवारांनी..🤣
— Vyankatesh Deshmukh - (Modi ka parivar)🇮🇳 (@Mee_Deshmukh) July 12, 2024
माजी आमदार जयंत प्रभाकर पाटील 🤭 pic.twitter.com/8EE4VGGq98
निवडणूक बिनविरोध होणार होती
— अक्षय | Indo (@BharatologyMeme) July 12, 2024
संख्याबळनुसार महायुतीचे ९ व मविआचे २ उमेदवार MLC होणार होते
जयंत पाटील सारखा कष्टकरी, शेतकरी, अभ्यासू व्यक्ती, आगरी कोळी नेता निवडुण येणार होता
पण वेळेवर उबाठा गटाने दोस्तीत कुस्ती केली, गद्दारी केली आणि मिलिंद नार्वेकरला उभं केलं
शेवटी व्हायचं ते झाल pic.twitter.com/gDHihJXZt7
जयंत पाटील यांचा शरद पवारांनी गेम केला, एकीकडे पाठिंबा द्यायचं नाटक करायचं दुसरीकडे उध्दव ठाकरे यांना सांगून मिलिंद नार्वेकर यांना उभ केल.
— Vinod bharat bonapart (@Vinod74606019) July 12, 2024
आधी वसंत दादा पाटील आता जयंत पाटील, असा खंजीर सम्राट नाही होणे.
शेकापच्या जयंत पाटलांनी लोकसभा इलेक्शनमध्ये रायगडात सुनिल तटकरेंना मदत केली होती त्याचं रिटर्न गिफ्ट आज तटकरेंनी जयंत पाटलांना दिलं. pic.twitter.com/c2g3sEIQfK
— धनुभाऊ 𝕏 (@DhanubhauX) July 12, 2024
माझी 12 मतं मला मिळाली पण.... जयंत पाटील पराभवानंतर काय म्हणाले?
विधानपरिषदेत पराभव झाल्यानंतर जयंत पाटील तडकाफडकी अलिबागसाठी रवाना झाले. एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. "माझी बारा मते मला मिळाली. काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटली. जाऊदे आता नको बोलायला. ", एवढीच माफक प्रतिक्रिया त्यांनी दिली.