Parag Shah: 500 कोटीचे 3300 कोटी कसे झाले, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाहांनी लेखाजोखा मांडला
BJP Candidate Parag Shah Wealth: राज्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून भाजपचे पराग शाह यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यानी प्रतिज्ञा पत्रात तब्बल 3383.06 करोड इतकी संपत्ती घोषित केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून भाजपचे पराग शाह (Parag Shah) यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यानी प्रतिज्ञा पत्रात तब्बल 3383.06 करोड इतकी संपत्ती घोषित केली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यानी 500.62 कोटी इतकी संपत्ती प्रतिज्ञा पत्रात घोषित केली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्ती मध्ये तब्बल सहा ते सात पट वाढ झाली आहे. तसेच त्यांना उमेदवारी देखील अतिशय उशिरा घोषित झाल्याने त्यांची पुन्हा चर्चा रंगली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षाचे नेते आणि अपक्षांनी मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचे फॉर्म भरले. यावेळी उमेदवारांनी आपापल्या संपत्तीचा तपशील (Election Affidavit Wealth) निवडणूक आयोगापुढे सादर केला. यामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
विरोधकांची नक्की टीका काय आहे, मला कळत नाही- पराग शाह
दरम्यान याच मुद्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महायुतीच्या सात नेत्यांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांनी 7 नेत्यांची नावं ट्विट केली आहेत. यामध्ये गीता जैन, पराग शाह, राहुल नार्वेकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र आता याच टीकेला भाजपचे नेते आणि उमेदवार पराग शाह यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, विरोधकांची नक्की टीका काय आहे, मला कळत नाही. माझ्याकडे जी संपत्ती आहे ती मेहनतीने कमावलेली आहे, पेपरवर आहे. स्टॉक प्राईजवर सर्व आहे, माझी कंपनी लिस्टेड आहे. आता तर आणखी 15 रुपयाने भाव वाढला आहे. माझी जी संपत्ती आहे देशाच्या , समाजाच्या कामाला लागते आहे.
उमेदवार म्हणून कोणाची ही इच्छा होऊ शकते, पण...
घाटकोपर पूर्वमधील (Ghatkoper East Vidhan Sabha ) भाजपचे उमेदवार पराग शाह (Parag Shah)यांना उशिरा तिकिट घोषित झाले यावर बोलताना ते म्हणाले की, ज्या उमेदवारांनी तिकिट मागितले ते माझ्या समोर मागितल नाही. कोणाची ही इच्छा होऊ शकते, पण द्यायचे कोणाला आणि कधी ते वरिष्ठ ठरवतात. तिकीट मागणे आणि कार्य करणे वेगळे आहे. मी पाच वर्ष काम केले आहे, त्यामुळे वेळेच काही नाही. असे ही ते म्हणाले.
विरोधक जेवढा विरोध करतील तेवढी माझी ताकद वाढेल
मी व्यापारी, समाजसेवक, राजकारणी आहे. चॅलेंज स्वीकारत असतो , गाफील राहणार नाही. मी कोणाकडून खंडण्या मागितल्या नाहीत, त्रास दिला नाही, लोकांचे काम केले आहे. माझ्या कार्यक्षमतेवर मला भरोसा आहे. विधानसभेत कमी काम केल्याबद्दल मला प्रजा फाऊंडेशनने पाचवा नंबर दिला होता. राजकारणात दोन पद्धतीने काम होते. काम करणे आणि दिखावा करणे. मी काम केले आहे. विरोधक जेवढा विरोध करतील तेवढी माझी ताकद वाढेल. असेही पराग शाह (Parag Shah) म्हणाले.
पराग शाह यांची 5 वर्षांपूर्वी किती संपत्ती होती?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराग शाह यांनी आपली संपत्ती 550.62 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत. पराग शाह महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराग शाह हे 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 132 मधून विजयी झाले होते.
हे ही वाचा