एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?

Yeola Assembly Constituency : 2019 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली.

नाशिक : येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यांसमोर येते. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला मतदारसंघात माळी, विणकरी, मराठी, वंजारी या समाजाचे प्राबल्य दिसून येते. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला म्हणूनही येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड  छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

येवला मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2004 साली छगन भुजबळ यांनी येवल्यात एन्ट्री घेतली. मंत्री भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख झाली. गेल्या चार पंचवार्षिकपासून भुजबळ येवल्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

2004 पासून छगन भुजबळांचे येवल्यावर वर्चस्व

2004 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना 79 हजार 306 तर कल्याणराव पाटील यांना 43 हजार 657 मते मिळाली होती. 2009 मध्ये भुजबळ यांनी 1 लाख 6 हजार 416 मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीत 1 लाख 12 हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत 66 हजार 345 मते मिळाली. तर 2019 मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली. तर पवार यांना 69 हजार 712 मते मिळाली होती.

छगन भुजबळांची राज्यभर चर्चा

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले. तसेच मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगेंशी झालेल्या वादांवरुन आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे भुजबळांची राज्यभरात चर्चा झाली आहे. आता अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात अजून महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. 

महाविकास आघाडीकडून माणिकराव शिंदे रिंगणात

दरम्यान, महाविकास आघाडीत येवल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला गेली आहे. मात्र, काँगेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षानेही येवल्याच्या जागेवर दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे उमेदवारीसाठी गर्दी दिसून आली. अॅड. माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, उषाताई शिंदे, सानीया होळकर, गोरख पवार, सचिन आहेर आदी प्रमुख इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखतीही दिल्या होत्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आपले काका शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आले होते. मात्र शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात हिरामण खोसकर बाजी मारणार की लकी जाधव?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 28 OCT 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaShrinivas Vanga Cries Palghar : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले!Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Embed widget