एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात हिरामण खोसकर बाजी मारणार की लकी जाधव?

Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency : 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले हिरामण खोसकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत महायुतीतील (Mahayuti) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. हिरामण खोसकर यांना अजित पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसने लकी जाधव (Lucky Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

मागील वर्षी झालेल्या राज्यसभा आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगमुळे हिरामण खोसकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोसकर इतर पर्यायांच्या शोधात होते. अखेर हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. हिरामण खोसकर यांनी पक्ष प्रवेश करताच त्यांना अजित पवार यांच्याकडून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

इगतपुरी काँग्रेसचा बालेकिल्ला 

या मतदारसंघात 1980 पासूनचा आढावा घेतल्यास 1980, 1985, 1995, 2009 आणि 2014 अशा पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकला होते. 1999 मध्ये पांडुरंग गांगड, तर 2004 मध्ये काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 1990 च्या एकाच निवडणुकीत यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले आहे.  

2019 विधानसभा निवडणुकीतील स्थिती 

• हिरामण खोसकर (काँग्रेस) : 86,561
• निर्मला गावित (शिवसेना) : 55,006
• लकी जाधव (वंचित बहुजन आघाडी) : 9,975
• योगेश शेवरे (मनसे) : 6,566

काँग्रेसकडून लकी जाधव रिंगणात

दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात एकीकडे हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेघाळ आणि काँग्रेसचे लकी जाधव, गोपाळ लहांगे, उषा बेंडकोळी, वैभव ठाकूर हे इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसने लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कुणाल पाटील आपला गड राखणार की परिवर्तन होणार?

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : धुळे शहर मतदारसंघात तिरंगी लढत, एमआयएमसमोर ठाकरे गट, भाजपचे आव्हान, कोण मारणार बाजी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar Nomination Form | सपत्नीक घेतलं देवदर्शन, रोहित पवार कर्जतमधून उमेदवारी अर्ज भरणारBandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोरABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8 PM 28 Sep 2024Top 70 at 7AM 28 Oct 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
वंचितची विधानसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर, अमित ठाकरे, रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Embed widget