मला वाटलं नव्हतं एवढा नाटकी आहे, मी जाणार नाही बोलला, दुसऱ्या दिवशी लाच घेऊन नाचायला गेला, उद्धव ठाकरेंचा संजय बांगरांवर हल्लाबोल
आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray : आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. कितीही नाटकं केली पैसा ओतला तरी समोरचे विकणार नाहीत. गद्दार विकला जातो निष्ठावान विकला जात नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यावर टीका केली. यावेळी तुम्हाला गद्दारालाच पाडायचे आहे असंही ठाकरे म्हणाले. शिवसेना फुटली तेव्हा मी वर्षा निवासस्थान सोडलं, त्यावेळी हा गद्दार सांगत होता साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका आणि दुसऱ्या दिवशी लाच घेऊन गेला तिकडे नाचायला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर टीका केली. बराच वेळ माझ्याकडे यायचा साहेब मला वाचवा, मला तेव्हा वाटलं नाही हा एवढा नाटकी आहे असेही ठाकरे म्हणाले.
मी आज हिंगोलीत गुंडगिरीवर नांगर फिरवायला आलो आहे. नवीन पीक घेण्याआधी नांगरटी करावी लागते. गेल्या निवडणुकीत मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपल्या विरोधात गद्दारच उभा आहे. सर्व गद्दारांना पाडा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. विषय गद्दाराचा नाही.
सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो
सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कालच्या सभेत लोकांनी सांगितले 60 टक्के पैसे खातात, ज्यांच्यावर आपण नांगर फिरवायला आलोय त्यांची दाढी किती वाढली बघा. जास्त मस्ती दाखवू नको आमचं सरकार येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः च्या वडिलांच्या फोटोची यांना लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो लावला जातो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते असेही ते म्हणाले.
विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले
विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतो आणि कोणाला काही पडले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार आल्यावर शिवाजी महाराजांचा मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. सध्या राज्यात महिलांवर अत्याचार होतायेत, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. जय श्रीराम प्रमाणे आज पासून जय शिवराय असं म्हणायचं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या गीतातून शिवाजी महाराजांचं नाव वगळण्यास निवडणूक आयोगाने सांगितलं होतं असेही ते म्हणाले. मुंबई अदनीच्या घशात घातली उद्या अख्खा महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतील. सरकार आल्यावर अदाणीच्या घशातून काढून सर्वांसाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.