एक्स्प्लोर

Sangamner Assembly Constituency Balasaheb Thorat : मोठी बातमी! काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पडला, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून पराभूत

Balasaheb Thorat Sangamner Assembly constituency : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचा मतदार संघ म्हणजे संगमनेर विधानसभा.

Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील निकाल आता समोर येत आहे. शिर्डी मधून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले आहेत. खरंतर शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी ते पुन्हा निवडणूक जिंकले आहेत. पण संगमनेरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पडला आहे.

होय, संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी येथे मनसेकडून योगेश सूर्यवंशी देखील रिंगणात होते, पण अटीतटीच्या या तिरंगी लढतीत अमोल खताळ यांनी विजयाचा गुलाल उधाळला.  

जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचा मतदार संघ म्हणजे संगमनेर विधानसभा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मतदार संघात एकहाती वर्चस्व राहिले होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभेचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे याठिकाणी थोरात म्हणतील तीच पूर्व दिशा असे राजकारण रंगते. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून 1985 पासून 2019 पर्यंत असे सलग आठ वेळा निवडून आले आहेत.  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना 63128 मते मिळाली होती. 

हे ही वाचा -

Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही

Kagal Vidhan Sabha : जिंकले, जिंकले, जिंकले! कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार; तुल्यबळ लढत देऊनही राजेंची पुन्हा निराशा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget