एक्स्प्लोर

Nevasa Assembly Constituency : नेवासा मतदारसंघात लंघे पाटलांचा डंका, माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा दारुण पराभव

Shankarrao Gadakh vs Vitthal Vakilrao Maharashtra Assembly Election 2024 : सहकारातून ग्रामोन्नती आणि संतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे.

Shankarrao Gadakh vs Vitthal Vakilrao Langhe Nevasa Assembly Constituency 2024 : सहकारातून ग्रामोन्नती आणि संतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. सहकारासोबतच राज्याच्या राजकारणातही अहमदनगर जिल्ह्याचा प्रभाव आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील आणखी एक महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणजे नेवासा. नेवासा तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेले शंकरराव गडाख यांची सत्ता आहे. जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातील निकालही आता समोर आला आहे. येथून महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठल वकीलराव लंघे (Vitthal Vakilrao Langhe) पाटील विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे माजी मंत्री उमेदवार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचा पराभव झाला आहे.

विठ्ठल वकीलराव लंघे पाटील यांना 95 हजार 444 मते मिळालीत तर ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांना 91 हजार 423 मते मिळालीत. अर्थातच लंघे पाटील 4 हजार 21 मतांनी निवडणूक जिंकली. प्रहार जनशक्ती पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे यांना 35 हजार 331 मते मिळालीत. शंकरराव गडाख हे काही राऊंड मध्ये पुढे होते, मात्र विठ्ठल लंघे यांनी नंतर आघाडी घेत बाजी मारली.

याआधी २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने गडाख यांचा पराभव केला होता. मात्र पुढच्याच पंचवार्षिकला गडाख यांनी या पराभवाचा वचपा काढला. सध्या भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव लंघे उत्सुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते अब्दुल शेख यांनी देखील नेवासा विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे भाजप नेमकं कुणाला रिंगणात उतरवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

२०१९ मध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप अशी चुरशीची लढत झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरराव यशवंतराव गडाख १,१६,९४३ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे बाळासाहेब उर्फ ​​दादासाहेब दामोधर मुरकुटे हे ३०.६६३ मतांनी पराभूत झाले होते  .नेवासा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाचा झंडा फडकवला होता. २०१४ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. यावेळी मात्र भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता.

हे ही वाचा -

Maharashtra Vidhnsabha Election 2024 : 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, दिग्गजांचे गड ढासळले, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात दिग्गजांचा पराभव

Eknath Shinde Shiv sena All Candidate List: एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल, एका क्लिकवर; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा पराभव

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली

व्हिडीओ

Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
BMC Election: मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
मोठी बातमी : मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
Embed widget