Raj Thackeray : राज ठाकरेंना पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी किती आमदारांची गरज आणि किती मते मिळवावीच लागणार?
या निवडणुकीमध्ये राज ठाकरे करिष्मा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपला पूरक भूमिका घेत शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Raj Thackeray : राज्याच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व अशी चुरस निर्माण झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election 2024) आज (23 नोव्हेंबर) येत आहे. यामध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करणार? याकडे राज्याचे नव्हे, तर या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. साम-दाम-दंड भेद सर्वकाही या निवडणुकीमध्ये वापरण्यात आल्याने मतदारराजाने नेमका कौल कोणाला दिला आहे याचीच उत्सुकता आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुद्धा महत्त्वपूर्ण घटक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यांमध्ये स्वबळावर 123 ठिकाणी उमेदवार दिले असले तरी या पक्षाच्या अस्तित्वासाठी मात्र तीन टक्के मते आणि तीन आमदार निवडून येणे आवश्यक आहे. तरच राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता टिकून राहू शकते.
दरम्यान निवडणूक आयोगाचे निकषानुसार एकाच पक्षाला त्याची निवडणूक आयोगाकडील अधिकृत मान्यता टिकवायची असल्यास निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या किमान आठ टक्के मते मिळवणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा कोटी 78 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज ठाकरे करिष्मा करणार का?
या निवडणुकीमध्ये राज ठाकरे करिष्मा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपला पूरक भूमिका घेत सीएम एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. इतकेच नव्हे तर माहीममधील घडामोडींमधून सुद्धा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता माहीमच्या जागेवरूनही राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये लढत आहे. तर ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी सुद्धा आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.
2019 मध्ये मनसेला केवळ एका आमदारांवर समाधान मानावे लागलं आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकींमध्ये मनसेला अनुक्रमे 16 लाख 65 हजार मते आणि 12 लाख 42 हजार मते मिळाली होती. दरम्यान मनसेने दिलेल्या 123 उमेदवारांपैकी 45 उमेदवार चांगली लढत देतील अशी अपेक्षा असल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या