एक्स्प्लोर

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ | मुंबईचा सांस्कृतिक चेहरा कुणाच्या बाजूनं?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार याच मतदारसंघातल्या सभेमुळे काढून घेतला गेला. विलेपार्ले मतदारसंघ म्हटलं की जुन्या शिवसैनिकांच्या बाळासाहेबांबद्दलच्या आठवणी जाग्या होतात. जुलै 1999 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर होतं, त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता.

मुंबई : दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्लेश्वर मंदिर, पाडवा पहाट, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी ओळखला जाणारा मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधला मराठी वस्तीचा भाग म्हणजे विलेपार्ले. विलेपार्ले हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. जुन्या काळी या भागात असलेल्या विर्लेश्वर आणि पार्लेश्वर या दोन मंदिरांच्या नावावरुन विले-पार्ले हे नाव पडल्याचं सांगितलं जातं.

मुंबई उपनगरामधल्या मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही याच मतदारसंघात येतं. मराठी भाषिकांचं प्रमाण इथे जास्त आहे. आता याठिकाणी गुजराती टक्काही वाढलाय. येथील मराठी व्यवसायिकांना गुजराती व्यवसायिकांची स्पर्धाही आहे.

मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

विलेपार्लेचा मतदारसंघ तसा कधीच कुणाचा गड राहिलेला नाही. इथले मतदार सजग आहेत. जो काम करेल, त्याला मत मिळेल या न्यायानुसार या मतदारसंघात कधीही कोणत्या पक्षाची सद्दी राहिलेली नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, जनता पक्ष, कधी अपक्ष अशा प्रत्येकालाच येथील मतदारानं संधी दिली आहे.

भाजपचे पराग अळवणी हे विद्यमान आमदार आताच्या निवडणुकीतही भाजपकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. 2014 मध्ये विधानसभेवर निवडून जाण्यापूर्वी पराग अळवणी प्रामुख्याने मुंबई महानगर पालिकेच्या राजकारणामध्ये सक्रीय होते. 1997 ते 2007 या 10 वर्षांच्या कालावधीत अळवणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आधी भाजपचे नगरसेवक आणि नंतर गटनेते म्हणून कार्यरत होते. 2014 मधल्या मोदी लाटेमध्ये पहिल्यांदाच पराग अळवणी विधानसभेवर निवडून आले. ऑक्टोबर 1989 मध्ये मिठीबाई कॉलेजमध्ये लॉच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या ओवेन डिसोझा या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी अळवणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, 2002 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

अळवणींना टक्कर कुणाची?

2014 मध्ये भाजप -शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या शशिकांत पाटकरांनी अळवणींना कडवी झुंज दिली. आता युती झाली तर भाजपच्या विद्यमान आमदारांऐवजी शिवसेनेला हा मतदारसंघ सहजासहजी मिळणं शक्य नाही. मात्र युती तुटली तर हा मतदारसंघ जिंकण्यासाठी सेना जंग जंग पछाडेल हे नक्की. विलेपार्ले मतदारसंघाशी बाळासाहेबांबद्दलच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. शिवाय बाळासाहेबांची हिंदुत्वाची घोषणा घुमली ती देखील याच मतदारसंघात. त्यामुळे, शिवसेनेला विलेपार्ले मतदारसंघावर भगवा फडकवायचा आहे. युती तुटली तर शिवसेनेकडून शशिकांत पाटकर आणि दिपक सावंत हे दोन प्रमुख दावेदार असतील. या दोघांपैकी मातोश्री ज्याला निवडेल त्याला या मतदारसंघात अळवणींना फाईट देता येईल.

बाळासाहेब, विलेपार्ले मतदारसंघ आणि हिंदूत्व

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार याच मतदारसंघातल्या सभेमुळे काढून घेतला गेला. विलेपार्ले मतदारसंघ म्हटलं की जुन्या शिवसैनिकांच्या बाळासाहेबांबद्दलच्या आठवणी जाग्या होतात. जुलै 1999 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर होतं, त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. केवळ मतदानच नव्हे तर निवडणुकीलाही उभं राहण्यास मनाई करण्यात आली होती. याला कारण ठरली ती 1987 मधील पोटनिवडणुकीसाठी घेतलेली विलेपार्लेतली बाळासाहेबांची सभा.

1987 मध्ये विलेपार्ले पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मतं मागितल्याचा आरोप होता. त्यावेळी बाळासाहेबांनी 'गर्व से कहो हम हिंदू है' अशी घोषणा दिली. बाळासाहेबांनी धर्माच्या नावे मतं मागितल्याचा आरोप झाला.

काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांचं 1987 मध्ये निधन झालं. भुग्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यावेळी शिवसेनेकडून डॉ. रमेश प्रभू तर काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे हे रिंगणात होते. कुंटे यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत या निकालाला आव्हान दिलं. कुंटे यांचे नाव त्यावेळी राज्यभरात चर्चेत होतं. त्याविरोधात शिवसेनेने मुंबईचे तत्कालिन महापौर डॉ रमेश प्रभू यांना मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन लढलेली पहिली निवडणूक होती. बाळासाहेबांनी 'गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा त्यावेळी दिला होता.

बाळासाहेब ठाकरेंनी जाती-धर्माच्या आधारे मतं मागितल्याचा आरोप कुंटे यांनी हायकोर्टात केला होता. पुढे हा खटला चालला आणि 1999 मध्ये निवडणूक आयोगाने बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली. 1999 ते 2005 पर्यंत बाळासाहेबांवर मतदान करणं किंवा निवडणूक लढवण्यास बंदी होती. यानंतर दोन वर्षांनी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल 8 वर्षांनी बाळासाहेबांनी मतदान केलं होतं.

2007 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं. बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या घोषणेची आठवण करुन देणारा हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणं हे शिवसेनेच्या दृष्टीनं महत्वाचं आहेच. पण त्याची गणितं युतीच्या निर्णयावरच अवलंबून असतील.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल
  • पराग अळवणी (भाजप) - 74,270
  • शशिकांत पाटकर (शिवसेना) - 41,835
  • कृष्णा हेगडे (काँग्रेस) - 24,191
  • सुहास शिंदे (मनसे) - 5882
  • पिमेंटा गॉडफ्रे (अपक्ष) - 1733
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Embed widget