एक्स्प्लोर

कणकवली विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे बालेकिल्ला राखणार?

नारायण राणे यांचा राजकीय वारसा चालवत नितेश राणे यांनी 2009 साली राजकारणात पाऊल ठेऊन पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने काँग्रेसकडून निवडून आले. 2014 साली भाजपच्या प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणकवली कासार्डेत भव्य सभा घेऊनही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही.

सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड, वैभववाडी तीन तालुके येतात. कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. कणकवली मतदार संघात 268 गाव येतात. नारायण राणे कणकवली-मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले. त्यानंतर 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यात कुडाळ-मालवण असा मतदारसंघ झाला. या 2009 साली कुडाळ-मालवण या मतदारसंघात नारायण राणे पुन्हा एकदा निवडून आले.

सलग सहाव्यादा विधानसभेत विक्रमी मताधिक्‍याने निवडून आल्यानंतर 2014 साली नारायण राणे यांचा बालेकिल्ला ढासळला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 हजार मताधिक्‍याच्या फरकाने नारायण राणे यांचा पराभव केला. 2009 च्या पुनर्रचनेनंतर कणकवली, देवगड, वैभववाडी असा विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. मात्र 2009 च्या कणकवली विधानसभा मतदारसंघात राणेंनी काँग्रेसमधून रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली. मात्र रवींद्र फाटक यांचा 34 मतांनी पराभव झाला. त्यानंतर राणे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा कणकवली मतदारसंघ 2009 साली भाजपच्या ताब्यात गेला. 2014 साली पुन्हा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. आणि राणे पुन्हा आपला बालेकिल्ला काबीज केला.

कणकवली विधानसभा मतदारसंघात देवगड तालुक्यात गाबीत समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. कारण देवगड तालुका हा समुद्र किनारी असल्याने याठिकाणी गाबीत समाजाचे प्राबल्य आहे. तर वैभववाडीत मराठा समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र या संपूर्ण कणकवली मतदारसंघात जातीय समीकरण बांधून एखादा उमेदवार निवडून येणे अशक्य आहे. 2019 च्या निवडणुकीत नितेश राणे कणकवली मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नितेश राणे कणकवली मतदारसंघ राणेंचा बालेकिल्ला राखण्यात पुन्हा यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

नारायण राणे यांचा राजकीय वारसा चालवत नितेश राणे यांनी 2009 साली राजकारणात पाऊल ठेऊन पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने काँग्रेसकडून निवडून आले. 2014 साली भाजपच्या प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणकवली कासार्डेत भव्य सभा घेऊनही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. 2014 साली काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना नितेश राणे यांनी 74 हजार 715 मत घेऊन निवडून आले होते. मात्र भाजपचे प्रमोद जठार यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही केवळ 48 हजार 736 मत मिळाली. 25 हजार पेक्षा जास्त मताधिक्‍य घेऊन नितेश राणे कणकवली मतदारसंघात विजयी झाले.

नारायण राणे शिवसेनेत असल्यापासून कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे कणकवलीचा राणेंचा बालेकिल्ला राखणार का? याकडे राजकीय क्षेत्रात लक्ष लागून आहे.

2009 विधानसभा निवडणूक मतदान

  • प्रमोद शांताराम जठार (भाजप) - 57,651
  • रवींद्र सदानंद फाटक (काँग्रेस ) - 57,617
  • कुलदीप पेडणेकर (जनसुराज्य पक्ष ) - 24,566
  • महेंद्र नाटेकर (अपक्ष) - 2,935
  • सीताराम वासुदेव जाधव (बसपा)- 1,717

2014 विधानसभा निवडणूक मतदान

  • नितेश राणे (काँग्रेस) 74,715
  • प्रमोद जठार (भाजप) 48,736
  • सुभाष मयेकर - 12,863
  • अतुल रावराणे 8,196

2019 विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार

  • नितेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
  • प्रमोद जठार (भाजप)
  • संदेश पारकर (भाजप)
  • अरुण दुधवडकर (शिवसेना) युती न झाल्यास

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे शिक्षक जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे शिक्षक जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Embed widget