एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बंडखोरी करणाऱ्यांना युतीत कुठलंही स्थान नाही, महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा इशारा
पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलताना आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं, काही गोष्टी बसून ठरवायच्या असतात असं मत व्यक्त केलं. तर लहान भाऊ-मोठा भाऊ या चर्चे पेक्षा दोन भाऊ नातं टिकवून एकत्र पुढे जात आहेत याचं समाधान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : महायुतीची पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीची औपचारिक घोषणा केली आहे. युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ असा सूचक इशारा यावेळी दिला आहे. तसेच मुख्यमत्र्यांनी महायुतीचा फॉर्म्युला देखील जाहीर केला. त्याप्रमाणे भाजप 150, शिवसेना 124 तर मित्रपक्ष 14 जागांवर लढणार असल्याचं फ़डणवीसांनी सांगितलं.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरुन तिढा असेल मात्र हिंदूत्वाचा धागा भाजप-शिवसेनेला जोडणारा आहे. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र युती होणार यावर आमच्या मनात कुठलीच शंका नव्हती. लोकसभेनंतर विधानसभेत आम्ही सोबत युतीत राहावं ही आधी जनतेची इच्छा होती. युतीत काही वाटाघाटी कराव्या लागतात त्या आम्ही केल्या आहेत. विधानसभेत महायुती प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलताना आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं, काही गोष्टी बसून ठरवायच्या असतात असं मत व्यक्त केलं. तर लहान भाऊ-मोठा भाऊ या चर्चे पेक्षा टिकवून एकत्र पुढे जात आहेत याचं समाधान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Vinod Tawde on Candidature | तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंनी काय प्रतिक्रिया दिली? | मुंबई | ABP Majha
मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना थेट इशारा
युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ असा सूचक इशारा दिला आहे. राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे, मात्र पुढच्या दोन दिवसात या सगळ्यांना अर्ज मागे घ्यायला सांगणार आहोत. जो उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी ऐकणार नाही त्यांना युतीत कुठलंही स्थान मिळणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिला आहे.
आदित्य ठाकरेंबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?
शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत दिसतील, त्यामुळे त्यांचं विशेष स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसेच आदित्य ठाकरे मुंबईत सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
VIDEO | नव्या पिढीसाठी मला तिकीट नाकारलं : एकनाथ खडसे | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
