Vijay Wadettiwar : शिवसेना स्वतंत्र लढणार, काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना भेटणार; निवडणुकांबाबत वडेट्टीवारांना मांडली भूमिका
Vijay Wadettiwar : शिवसेनेला जर स्वबळावर लढायचं असेल तर ते लढू शकतात. मात्र आम्ही इंडिया आघाडी म्हणून सक्षम असल्याची भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे.
Vijay Wadettiwar : संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणुकीत लढण्याचा नारा दिला असला तरी, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून सर्व एकत्र आहोत. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या बाबत चर्चा होईल. त्यांना जर स्वबळावर लढायचं असेल तर ते लढू शकतात. मात्र आम्ही इंडिया आघाडी म्हणून सक्षम असल्याची भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे.
शिवसेना ठाकरे गट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. कारण मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतोय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनीही प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.
हे दुर्दैव असून संजय राऊत यांची ती सवय- वर्षा गायकवाड
संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठी मांडतील. विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल आमच्या कार्यकर्त्यांनी जास्त जागा मागीतल्या, त्या मात्र आम्ही आघाडी धर्म पाळला आणि आघाडी केली. ही आघाडी धर्म पाळून पहिल्यांदा आघाडीमध्ये चर्चा केली पाहिजे होती. मात्र हे दुर्दैव असून संजय राऊत यांची ती सवय आहे. आमच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हे आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
स्वबळावर लढावंच लागेल, राऊतांच्या भूमिकेला अरविंद सावंतांचा पाठिंबा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल तर अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावं. स्वबळावर लढावं, संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
हे ही वाचा