या वयात असं वागणं बरं नव्हे, नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
शरद पवार आज माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी सांगोला तालुक्यातील कोळा येथे प्रचाराला आले होते.
![या वयात असं वागणं बरं नव्हे, नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर loksabha election 2019 sharad pawar on PM narendra Modi या वयात असं वागणं बरं नव्हे, नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/10080339/Sharad-Pawar-Narendra-Modi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सगळ्याच पक्षातील नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. या वयात असं वागणं बरं नव्हे, असं नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
शरद पवार आज माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी सांगोला तालुक्यातील कोळा येथे प्रचाराला आले होते. तेथील सभेत बोलताना शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदी वारंवार प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कामांच्या प्रचारापेक्षा ते माझ्याच घरावर जास्त बोलत आहेत. मात्र त्यांना घराचा काय अनुभव आहे, असा टोला पवारांनी लगावला.
माझ्या कुटुंबाचा बारदाना मोठा आहे. हा फकीर याला घर कसले, निदान आम्हाला तरी दिसले नाही. आता दिल्लीत गेल्यावर त्यांना सांगेन या वयात लोकाच्या घराच्या चौकशा करणं, असं वागण या वयात बरं नव्हे, अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)