(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसवाले राज ठाकरेंच्या मागे लागलेत, मात्र त्यांचं 'इंजिन' बंद आहे; रामदास आठवलेंचा टोला
56 पक्ष मिळून तुम्ही आघाडी केली आहे. पण महायुती तुम्हाला पुरुन उरणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येऊ नयेत असं विरोधक म्हणत आहेत. मात्र मोदीच पुन्हा निवडून यावे असं लोक म्हणत आहेत.
सांगली : वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आहे. तर राज ठाकरे यांचं इंजिन बंद असून त्या इंजिनमध्ये डिझेल नसल्याने ते पुढे जाणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत केली आहे.
काँग्रेसवाले आता राज ठाकरे यांच्या मागे लागले आहेत. पण राज ठाकरेंचं इंजिन बंद आहे. अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. सांगलीत काँग्रेसला संपवण्याचे काम काँग्रेस करत आहे. सांगलीच्या जागा जिंकण्याची शाश्वती नसल्याने ही जागा काँग्रेसने स्वाभिमानीला दिली. विशाल पाटील यांनी स्वाभिमानीसोबत जायला नको होते. वसंतदादा यांची मानहानी करण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असा अशी टीका रामदास आठवलेंनी काँग्रेसवर केली.
राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळाली, पण...
56 पक्ष मिळून तुम्ही आघाडी केली आहे. पण महायुती तुम्हाला पुरुन उरणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येऊ नयेत असं विरोधक म्हणत आहेत. मात्र मोदीच पुन्हा निवडून यावे असं लोक म्हणत आहेत.
रामदास आठलेंनी कविता सादर करत भाजपला मतदान करण्याचं आवाहन जनतेला केला. काकाने मजबूत केला आहे.. प्रत्येक नाका.. कमळाला मतदान करुन मुख्यमंत्री यांची मान राख.. अशी त्यांच्या खास शैलीतील कविता रामदास आठवलेंनी यावेळी सादर केली.
UNCUT | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण VIDEO | विधानसभेत आघाडीला मनसेचं इंजिन लागणार का?, छगन भुजबळांकडून स्पष्ट संकेत