Yusuf Pathan Lok Sabha Election Result : युसूफ पठाण पश्चिम बंगालच्या बहरामपूरमधून विजयी, काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींचा पराभव
Yusuf Pathan Lok Sabha Election Result : भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू युसूफ पठाण तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे.
बहरामपूर : पश्चिम बंगालमधील (West Bengal) बहरामपूर लोकसभा (Bahrampur) मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलंय.भारतीय क्रिकेट संघासाठी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या युसूफ पठाण (Yusuf Pathan) राजकारणाच्या मैदानात एंट्री घेतली. विशेष म्हणजे युसूफ पठाण समोर काँग्रेसचे लोकसभेतील गट नेते खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांचं आव्हान आहे. युसूफ पठाण यानं बहरामपूरमधून आघाडी घेतली होती. तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाण यानं अधीर रंजन चौधरींना पराभूत केलं.
बहरामपूर लोकसभा मतदारसंघात 2009 च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. अधीर रंजन चौधरी यांनी 2009 पासून या मतदारसंघात विजय मिळवला आहे. अधीर रंजन चौधरींपुढं यावेळी तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाणनं आव्हान उभं केलं आहे. भाजपनं या मतदारसंघात निर्मल कुमार साहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बहरामपूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान पार पडलं होतं.
अधीर रंजन चौधरी यांनी 2009 पासून या ठिकाणी सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तर,2019 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अपूर्व सरकार यांना 80696 मतांन पराभूत केलं होतं. तर, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीच्या इंद्रनील सेन यांच्यावर अधीर रंजन चौधरींनी विजय मिळवला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांनी विजय मिळवत रिवॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टी पक्षाकडून बहरामपूरची जागा आपल्याकडे घेतली होती.
काँग्रेसचं बहरामपूर मतदारसंघावर वर्चस्व असलं तरी या मतदारसंघात आता काँग्रेसचा एकही आमदार नाही. बुरवान, कंदी, बेल्दंगा, नओदा, भरतपूर बहरामपूर आणि रेजिनगर हे मतदारसंघ बहरामपूर लोकसभा मतदारसंघात येतात. या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे सहा आमदार आहेत.तर, बहरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे.
ममता बॅनर्जींची खेळी यशस्वी ठरणार?
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेचे 42 मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं 22 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली होती. भाजपनं त्यावेळी 18 जागा जिंकल्या होत्या. तर, काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. अधीर रंजन चौधरींची बहमरामपूरची जागा काँग्रेसनं जिकंली होती. या जागेवर तृणमूल काँग्रेसला यश मिळालं नव्हतं. ही जागा खेचून आणण्यासाठी ममता बॅनर्जींनी युसूफ पठाणला उमेदवारी दिली होती. या जागेवर युसूफ पठाणच्या उमेदवारीनं रंगत निर्माण झाली होती.
अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळं ममता बॅनर्जी यांनी अधीर रंजन चौधरींच्या विरोधात थेट क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये अधिक जागा मिळवण्याचा ममता बॅनर्जींचा प्रयत्न आहे.
संबंधित बातम्या :
देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार : अंबादास दानवे