Akola Lok Sabha Result 2024 : अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे जायंट किलर, प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेसच्या अभय पाटलांचा दारुण पराभव
Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपने अकोला लोकसभा मतदारसंघात अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरवले होते.
Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. संजय धोत्रे आजारी असल्याने अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं.
उमेदवारांची नावे
अभय पाटील - काँग्रेस - पराभूत
अनुप धोत्रे - भाजप - विजयी
प्रकाश आंबेडकर - अकोला - पराभूत
अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली
अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढला होता. 2019 मध्ये अकोल्यात 59. 76 टक्के मतदान झालं होतं. 2024 मध्ये झालेल्या मतदानात अकोल्याचा टक्का हा 61.79 टक्क्यांवर गेला. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार होते. त्यापैकी 11 लाख 68 हजार 348 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान बजावला होता. अकोला लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निहाय मतदान
मतदारसंघ | एकुण मतदान | झालेलं मतदान | टक्केवारी |
अकोट | 300362 | 192283 | 64.02% |
बाळापूर | 300662 | 200170 | 68.58% |
अकोला (पश्चिम) | 332763 | 182599 | 54.87% |
अकोला (पूर्व) | 340802 | 202294 | 59.36% |
मुर्तिजापूर | 300296 | 193761 | 64.52% |
रिसोड | 315929 | 197241 | 62.43 |
एकूण | 1890814 | 1168348 | 61.79% |
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
अकोट - प्रकाश गुणवंतराव भारसाकले - भाजप
बाळापूर - नितीन तळे- शिवसेना
अकोला (पश्चिम) - गोवर्धन शर्मा - भाजप
अकोला (पूर्व) - रणधीर सावरकर - भाजप
मुर्तिजापूर - हरीश पिंपळे - भाजप
रिसोड - अमित झनक - काँग्रेस
2019 सालचा निवडणूक निकाल - (Akola Lok Sabha Constituency 2019 Result)
संजय धोत्रे - भाजप - 5 लाख 54 हजार 444 मत
प्रकाश आंबेडकर - 2 लाख 78 हजार 848 मत
हिदायतुल्लाह पटेल - 2 लाख 54 हजार 370 मत
संजय धोत्रे सलग 4 वेळेस खासदार
संजय धोत्रे 2004, 2009, 2014, 2019 असा चार वेळेस सलग खासदार म्हणून निवडून आले. दरम्यान, यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी न देता त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरवले. त्यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन प्रचार सभा घेतल्या होत्या. अनुप धोत्रे यांना प्रचारादरम्यान, रोषाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि राज्यमंत्री रणजित पाटील यांनीही अनुप धोत्रेंची किती काम केलं? याच्यावर बऱ्याच गोष्टी निर्भर होत्या.
अकोला लोकसभेत पीएम मोदींचा प्रभाव दिसला नाही ,असेही बोलले गेले. शेतकरी समस्या, एमआयडीसी उद्योजकांसमोरील समस्या महत्वपूर्ण ठरल्या. अनेक रस्त्यांचे काम प्रलंबित होते, हे प्रश्नही काँग्रेसकडून उचण्यात आले. गेल्या 20 वर्षांपासून वडिल खासदार असल्यामुळे अनुप धोत्रेंना अँटी इन्कबन्सीला सामोरे जावे लागले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, राज ठाकरेंच्या सभेमुळे निवडणूक प्रतिष्ठेची, कोण बाजी मारणार?