उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांसह 6 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता, पराभवाची कारणे काय?
North Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांपैकी सहा जागांवर कब्जा करण्यात महाविकास आघाडीला यश आले. तर महायुतीला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
North Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा बसला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह 6 विद्यमान खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला. दिंडोरीत भारती पवार यांच्यासह नाशिकमधून हेमंत गोडसे (Hemant Godse), शिर्डीतून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande), अहमदनगरमधून सुजय विखे पाटील (Sujay VIkhe Patl), धुळ्यातून सुभाष भामरे (Subhash Bhamre), नंदुरबारमधून हिना गावित (Hina Gavit) या विद्यमान खासदारांना मतदारांनी दाखविला घरचा रस्ता दाखवला. तर रावेरमधून रक्षा खडसे (Raksha Khadse) या एकमेव विद्यमान खासदारांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या विजयी झाल्या.
महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून राष्टवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे, शिर्डीतून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, धुळ्यातून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव, नंदुरबारमधून काँग्रेसचे गोवाल पाडवी, अहमदनगरमधून शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाले. तर रावेरमध्ये शरद पवार गटाचे श्रीराम पाटील आणि जळगावमधून ठाकरे गटाचे करण पवार पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवाची कारणे...
नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Election Result 2024)
राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) - विजयी
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) - पराभूत
- नाशिक लोकसभा मतदार संघात सोपी वाटणारी निवडणूक महायुतीने अवघड केली.
- हेमंत गोडसे यांना उशिरा उमेदवारी घोषित केली.
- सुरुवातीला भाजपने गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतर भुजबळ यांनी उमेदवारीवर दावा केला
भुजबळ यांची नाराजी शेवटपर्यंत चर्चेत राहिले.
- भुजबळ नाराजीचा महायुतीला फटका बसला.
- हेमंत गोडसेंनाच उमेदवारी द्यायची होती तर उशीर का? केला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
- हेमंत गोडसेंच्या तुलनेने राजाभाऊ वाजे यांना दीड महिनाआधी उमेदवारी मिळाली.
- शिवसेना फूटीनंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागले त्याचे फळ मिळाले.
- मुस्लिम आणि दलित मतांचा ठाकरे गटाला फायदा झाला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ (Dindori Lok Sabha Election Result 2024)
भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - विजयी
डॉ. भारती पवार (भाजप) - पराभूत
- कांद्याच्या प्रश्नावर शेवटपर्यंत भारती पवार आणि भाजपला संघर्ष करावा लागला.
- शेतकऱ्यांचा रोष संपूर्ण प्रचार दरम्यान जाणवला.
- माकपचा महाविकास आघाडी पाठिंबा मिळाल्याने ती मते पारड्यात पडली.
- भारती पवार यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्यात त्या अपयशी ठरल्या.
- महायुतीचे सहा आमदार असूनही आमदारांना मते खेचण्यात अपयश आले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ (Ahmednagar Lok Sabha Election Result 2024)
निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट) - विजयी
सुजय विखे पाटील (भाजप) - पराभूत
- भाजपवर शेतकऱ्यांचा असलेला रोष.
- बेरोजगारीमुळे युवकांचा भाजपवर रोष.
- सुजय विखेंना पक्षांतर्गत संघर्ष थांबवण्यात अपयश आले.
- निलेश लंके यांच्याकडून सोशल मीडियावर प्रभावी प्रचार करण्यात आला.
- कोरोना काळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाचा प्रभाव पडला.
- धनशक्ती विरुध्द जनशक्ती हा मुद्दा मतदारांमध्ये बिंबवण्यात लंके यशस्वी ठरले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Election Result 2024)
भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) - विजयी
सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) - पराभूत
- महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी.
- दहा वर्षापासून खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांचा केला पराभव.
- सदाशिव लोखंडे दहा वर्ष खासदार असताना जनसंपर्काचा अभाव.
- शेवटच्या वर्षात अनेक काम सुरू केली. मात्र दहा वर्षातील नाराजीचा फटका.
- भाऊसाहेब वाकचौरे यांनी वेळीच उबाठा गटात प्रवेश करायचा घेतलेला निर्णय महत्वाचा ठरला.
- 2004 ते 2009 या काळात असलेला जनसंपर्क व कामे आज महत्वाची ठरली.
- उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी सभा घेत मतदारांना प्रभावित करण्यात यश मिळवलं.
धुळे लोकसभा मतदारसंघ (Dhule Lok Sabha Election Result 2024)
डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस) - विजयी
डॉ. सुभाष भामरे (भाजप) - पराभूत
- बागलाण पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी.
- धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होता.
- धुळे मनपात भाजपची सत्ता असून देखील पूर्ण न झालेली विकासकामे.
- मतदार संघात रोजगाराच्या संधी नसणे.
- धुळे शहर आणि मालेगाव मध्यमधील अल्पसंख्याक मतदारांची एकगठ्ठा ताकद काँगेसच्या पारड्यात पडली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ (Nandurbar Lok Sabha Election Result 2024)
गोवाल पाडवी (काँग्रेस) - विजयी
हिना गावित (भाजप) - पराभूत
- जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे राजकीय पद जिल्हा परिषद अध्यक्ष मंत्री पद आणि खासदार घरात असूनही नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती.
- प्रियांका गांधींच्या सभेमुळे वातावरणात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळाला. त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला मिळाला. तीन महिन्याच्या अंतराने जिल्ह्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सभा झाल्याने काँग्रेसचे पारंपारिक मतदार काँग्रेसच्या मागे गेलेत.
- महायुतीच्या घटक पक्षांमधील नाराजी आणि पक्षातील अंतर्गत गजबाजी याचा फटका खासदार हिना गावित यांना बसल्याची चर्चा.
- गोवाल पाडवी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून छोट्या-मोठ्या गावांना भेटीचा धडाका लावत तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले. उलट भाजपाकडून प्रचाराच्या संदर्भात नियोजनात गोंधळ.
- काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वे गट सोडून एकदिलाने कामाला लागले होते. मात्र भाजपातील जुना नवा वाद महायुतीतील अनेक कार्यकर्ते प्रचारापासून दूर दिसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसले.
जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha Election Result 2024)
स्मिता वाघ (भाजप) विजयी
करण पवार (शिवसेना ठाकरे गट) - पराभूत
- मागील वेळेस तिकीट कापले गेल्याने त्यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती होती.
- तिकीट कापले गेल्यानंतर त्यांच्या पतीचे निधन झाल्यानेही जनतेत सहानुभूती होती.
- गेल्या तीस वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असल्याचा फायदा झाला.
- मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाल्याने मोठी ताकद त्यांना मिळाली. शिवाय त्यांच्याविरोधात उमेदवार असलेले करण पवार यांचा त्यांच्या पारोळामध्ये प्रभाव असला तरी इतर तालुक्यात त्यांचा प्रभाव नसल्याचा फायदा स्मिता वाघ यांना झाला.
रावेर लोकसभा मतदारसंघ (Raver Lok Sabha Election Result 2024)
रक्षा खडसे (भाजप) - विजयी
श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) - पराभूत
- दहा वर्षात रक्षा खडसेंनी केलेली विकासकामे.
- एकनाथ खडसे यांचा पाठिंबा.
- रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला.
- विरोधी उमेदवार नवखे असल्याने फायदा झाला.
- श्रीराम पाटील यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.
- महिलांचे वाढलेले मतदान, महिला म्हणून फायदेशीर ठरले.
- पाच वर्षात जनतेत मोठा जनसंपर्क.
- शेतकऱ्यांसाठी विमा, रेल्वे सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न.
आणखी वाचा