Nashik Lok Sabha Election Result 2024 : '...तर मी राजाभाऊंसोबत एकत्र यायला तयार'; पराभवानंतर नेमकं काय म्हणाले हेमंत गोडसे?
Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी झाले. तर शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी बाजी मारली. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने पराभव झाला. आता यावर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेमंत गोडसे म्हणाले की, उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने हा निकाल आला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली. भाजपने उमेदवार घोषित केले. तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते. विरोधातील उमेदवाराला जास्त दिवस मिळाले त्यामुळे आम्ही डेमेज झालो. लोकांना गोडसे उमेदवार असणार की, नाही हा संभ्रम निर्माण झाला त्याचा फटका बसला.
नाशिकमध्ये सर्व मतदार सुज्ञ
कांदा प्रश्नाचा फटका बसला का? असे विचारले असता हेमंत गोडसे म्हणाले की, कांद्याचा प्रश्न नाशकात गंभीर आहे. सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न नाशिकमध्ये आहे. कांद्याचा निर्णय घ्यायला वेळ लागतो. ते लेट झाले म्हणून शेतकरी वर्गात नाराजी पसरली. नाशिकमध्ये सर्व मतदार सुज्ञ आहेत. मराठा-ओबीसी असा कोणताच फटका मला बसला नाही असे वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
...तर मी राजाभाऊंसोबत एकत्र यायला तयार
विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याबाबत हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने हा काळ महत्वाचा आहे. रिंग रोड, सुरत-चेन्नई हायवे आणि कुंभमेळाच्या कामात चांगल लक्ष दिले तर आपला विकास चांगला होईल. आपला दुष्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. सिन्नरच्या दुष्काळाची परिस्थिती कमी करता येऊ शकते. त्यासाठी अनेक प्रकल्प आहे.आयटी कंपन्यांना जागा आहे. नाशिकच्या विकासासाठी मी वाजेंसोबत एकत्र यायला तयार आहे, असे यावेळी हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
इतर महत्वाच्या बातम्या