एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशकात वाजेच ठरले 'राजे', ग्रामीण भागातील मतदान ठरले निर्णायक, गोडसेंच्या पराभवाची कारणे काय?

Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनीच बाजी मारली. हेमंत गोडसेंचा दारूण पराभव झाला.

Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनीच बाजी मारली. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची हॅटट्रिक यामुळे हुकली. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने अतिशय मानहानिकारक पराभव झाला. हट्टाने घेतलेल्या उमेदवारीनंतर निर्माण झालेली नाराजी आणि अॅन्टीइन्कम्बन्सीचा मोठा फटका गोडसे यांना बसला. 

दहा वर्षांत मतदारसंघात भरीव काम न झाल्याने मोठी नाराजी त्यांच्याबद्दल होती. मात्र, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राने उमेदवारीची घोषणा केल्यामुळे तिकिटासाठी अडून बसलेल्या गोडसेंना राजाभाऊ वाजे यांनी मोठ्या फरकाने पराभूत केले. 

हेमंत गोडसेंच्या पराभवाची कारणे काय? 

- मतदारसंघात जनसंपर्क दिसून आला नाही. 

- उमेदवारीसाठी वारंवार मुंबईवारी करावी लागली. 

- भाजपकडून गोडसेंच्या नावाबाबत नकारात्मक भूमिका, अहवालाच्या नावाखाली संभ्रम. 

- महायुतीत अगदी शेवटच्या कशी मिळालेली उमेदवारी. 

- 10 वर्षात मतदारसंघात भरीव कामे केली नाहीत, अशा मतदारांची भावना 

- शिंदे गटाचे संघटन कमी पडले. 

- मित्र पक्षांकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही.  

- भुजबळ नाराजी भोवल्याची चर्चा.  

- राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचारात सक्रीय सहभाग दिसून आला नाही. 

- नाशिक शहरात गोडसेंच्या प्रचारासाठी एकही मोठी सभा नाही. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी अनंत कान्हेरे मैदान येथे मोठी सभा घेतली. या सभेचाही फटका बसल्याची मतदारसंघात चर्चा 

- जुने शिवसैनिक ठाकरे गटात असल्याने फटका.  

- बंडखोरी लोकांना आवडली नसल्याची भावना. 

विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवारांना मिळालेली मते

सिन्नर विधानसभा 

राजाभाऊ वाजे  -  1 लाख 59 हजार 492

हेमंत गोडसे - 31 हजार 254

देवळाली विधानसभा 

राजाभाऊ वाजे  - 81 हजार 200

हेमंत गोडसे - 54 हजार 64

नाशिक पूर्व विधानसभा 

राजाभाऊ वाजे  - 89 हजार911

हेमंत गोडसे - 1 लाख 311

नाशिक मध्य विधानसभा 

राजाभाऊ वाजे  -  88 हजार 712

हेमंत गोडसे - 84 हजार 906

नाशिक पश्चिम विधानसभा 

राजाभाऊ वाजे  -  93 हजार 617

हेमंत गोडसे - 1 लाख 24 हजार 827

इगतपुरी विधानसभा 

राजाभाऊ वाजे  - 1 लाख 1 हजार 585

हेमंत गोडसे - 58 हजार 52

एकूण मतदान

राजाभाऊ वाजे - 6 लाख 14 हजार 517

हेमंत गोडसे - 4 लाख 53 हजार 414

ग्रामीण भागात अशी झाली लढत 

सिन्नर हे राजाभाऊ वाजे यांचे होमपीच आहे, या मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना 1 लाख 28 हजार 238 मतांची निर्णयाक आघाडी मिळाली. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे इथले आमदार आहे सिन्नरचा लीड वाढत असतानाच हेमंत गोडसे यांच्या समोर इगतपुरी मतदार संघातील लीड तोडण्याचे आव्हान उभे राहिले इगतपुरी मतदारसंघात 43 हजारांची आघाडी उभी राहिली. काँग्रेस हिरामण खोसकर इथले आमदार आहेत. सिन्नरला लागून असणाऱ्या देवळाली मतदारसंघातही हेमंत गोडसेंना पीछेहाट बघायला मिळाली. 27 हजार 136 मतांची आघाडी राजाभाऊ वाजेंना मिळाली. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे इथल्या आमदार आहेत. 

शहरी भागात अशी झाली लढत 

ग्रामिण भागातील राजाभाऊ वाजेंचा लीड नाशिक शहरातील भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या नाशिक पूर्व मतदार संघात तोडण्याचा प्रयत्न महायुतीने केला. हेमंत गोडसेंना नाशिक पूर्व मतदार संघात 10 हजार 400 मतांची आघाडी मिळाली. नाशिक पूर्वनंतर नाशिक पश्चिम मतदारसंघात हेमंत गोडसे यांना  31 हजार 210 मतांची आघाडी मिळाली. मात्र या दोन्ही मतदारसंघातील आघाडी सिन्नर, इगतपुरीचा लीड तोडू शकली नाही. भाजपच्या सीमा हिरे नाशिक पश्चिमच्या आमदार आहेत. शहरातील या दोन्ही मतदारसंघात हेंमत गोडसे यांना आघाडी मिळाली मात्र भाजपाच्या देवयानी फरांदे आमदार असणाऱ्या नाशिकमध्य मतदार संघात चुरशीची लढाई झाली. अल्पसंख्याक मतांच्या जोरावर राजाभाऊ वाजे यांचं पारडे पुन्हा जड झाले. भाजपच्या तीनही आमदाराच्या मतदार संघात हेंमत गोडसे यांना बऱ्यापैकी मते मिळाली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसच्या ताब्यात असणाऱ्या मतदार संघात हेमंत गोडसेंना फटका बसला आणि सरतेशेवटी त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.

आणखी वाचा 

Lok Sabha Election Results 2024 : नाशिकमधून वाजे, दिंडोरीतून भगरेंच्या विजयानंतर एकच जल्लोष, दोघांच्या होम मिनिस्टर म्हणाल्या....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
Sanjay Savkare Profile : चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
Sanjay Savkare Profile : चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
Chandrakant Patil : गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
Hasan Mushrif Profile : पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
Embed widget