एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्यातील मतदान संपले असून आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या चार जून रोजी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडले. आता सर्वांचे 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडताच वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी त्यांचे एक्झिट पोलचे (Exit Poll) आकडे जाहीर केले आहेत. या आकड्यांनुसार यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए (NDA)  बाजी मारण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narnedra Modi) यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी काही खास ट्वीट्स केले आहेत.

 नरेंद्र मोदी यांनी मानले जनतेचे आभार

शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत संपूर्ण भारताने मतदान केले आहे. ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मतदारांचा सक्रिय सहभाह हा आपल्या लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. मतदारांचे समर्पण आणि वचनबद्धता यामुळे आपल्या देशातील लोकशाहीची भावना सुनिश्चित होते. देशातील महिला तसेच तरुणांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो. त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.

सुरक्षा संस्थांचेही मानले आभार

संपूर्ण निवडणूक सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्थेने खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या सुरक्षा व्यवस्था संपूर्ण निवडणुकीदरम्यान दक्ष होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात सुरक्षित वातावरण निर्माण झाले. ज्यामुळे लोकांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरक्षा व्यवस्थेतील सर्वांनी दिलेली सेवा ही कौतुकास पात्र आहे, असेदेखील मोदी म्हणाले.

एनडीए कार्यकर्त्यांसाठी विशेष ट्वीट

एनडीएच्या कार्यकर्त्यांनी आपला विकासाचा अजेंडा जनतेला समजावून सांगितला. तीव्र उष्णता असताना एनडीच्या कार्यकर्त्यांनी काम केले.त्या सर्वांचे मी कौतुक करतो.  तीव्र उष्णता असताना  मी एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कौतुक करू इच्छितो. आपले कार्यकर्ते हेच आपलं बळ आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. 

मोदींची इंडिया आघाडीवर सडकून टीका

मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही टीका केली. इंडिया आघाडीला लोकांना आकर्षित करता आले नाही. इंडिया आघाडी ही जातीवादी, भ्रष्ट आहे. घराणेशाहीला पोसण्यासाठी इंडिया आघाडी करण्यात आली. इंडिया आघाडी भविष्यातील दृष्टीकोन सांगण्यात अपयशी ठरले. इंडिया आघाडीने संपूर्ण प्रचारात मोदी यांना लक्ष्य केले. पण जनतेने त्यांच्या प्रतिगामी राजकारणाला नाकारले आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

हेही वाचा :

Lok Sabha Election Exit Poll 2024 : भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरणार? तीन एक्झिट पोल NDAच्या बाजूने

ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज

ABP Cvoter Exit Poll 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget