एक्स्प्लोर

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार

भाजपमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत . तर भाजपमधील नाराजांचा फायदा उठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.

पुणे : पुण्यातील सदाशिव, नारायण, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि कसबा या पेठांचा या मतदारसंघात समावेश होतो. प्रसिद्ध शनिवारवाडा , लाल ,महल आणि ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं मंदिर ही इथली ओळख. भाजपचे गिरीश बापट इथून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून गेलेत. त्यावरून या मतदारसंघाचा स्वभाव आणि तोंडवळा लक्षात येण्यास हरकत नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट शहराचे खासदार म्हणून निवडून आल्याने कसब्याची जागा रिकामी  झालीय. या रिकाम्या जागेसाठी भाजपमध्ये अक्षरश: झुंबड उडालीय. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, नगरसेवक धीरज घाटे आणि मुख्यमंत्रांच्या जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक गणेश बिडकर अशी भाजपमधील इच्छुकांची भली मोट्ठी यादी आहे. त्याचबरोबर गिरीश बापट स्वतःच्या सुनेला उमेदवारी मिळवून देण्याचाही प्रयत्न करत असल्याचं बोललं जात. दुसरीकडे काँग्रेसकडून नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि नगरसेवक अरविंद शिंदे यांनी इथून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मनसेतून काँग्रेसमध्ये आलेल्या रवींद्र धंगेकरची या मतदारसंघात काम करणारा माणूस अशी प्रतिमा आहे. दोन विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 2009 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून लढणाऱ्या धंगेकरांचा अवघ्या आठ हजारांनीं गिरीश बापटांकडून पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसकडून लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती  रोहित टिळक त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिले मात्र त्यांनी घेतलेली चाळीस हजार मतं बापटांच्या पत्थ्यावर पडली. 2014 साली  शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदरवारांना विजयासाठी चांगलं मताधिक्य मिळत असताना गिरीश बापट जुजबी मताधिक्यांनी निवडून आले होती होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून गिरीश बापटांना बावन्न हाजराचं मताधिक्य मिळालं. त्यामुळे भाजपसाठी कसब्याची जागा नेहमीप्रमाणे सुरक्षित मानली जातीय. परंतु मनसेकडून गिरीश बापटांना कडवी टक्कर देणारे रवींद्र धंगेकर विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये आलेत. धंगेकरांची स्वतःची मतं आणि काँग्रेसची स्वतःची मत यांची बेरीज झाल्यास ते भाजपच्या नवख्या उमेदवाराला घाम फोडू शकतात. या मतदारसंघात भाजपची जशी परंपरागत मतं आहेत तशीच काँग्रेसचीही आहेत . त्याच मतांच्या आधारे काँग्रेस नेते वसंत थोरात यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गीरीश बापट यांचा पराभव केला होता. मात्र  ती गिरीश बापटांच्या राजकारणाची सुरुवात होती. त्यानंतर गिरीश बापटांनी विधानसभेच्या सलग पाच निवडणूक इथून जिंकल्या आणि सोबत भाजपाचाही आणखी विस्तार झाला. या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर मराठा समाजातील मतदार आहेत. अल्पसंख्यांक आणि दलित समाजाचीही इथं बऱ्यापैकी संख्या आहे. त्यामुळं वंचित विकास आघाडी लोकसभेप्रमाणे वेगळी लढल्यास वंचितच्या उमेदवाराने घेतलेली मतं निर्णायक ठरु शकतात. जुन्या वड्यांचा प्रश्न या मतदारसंघात वर्षनुवर्षे रखडलाय. पुण्याच्या इतर भागांचा मेकओव्हर होत असताना पेठा मात्र तशाच जुन्या राहिल्यात . त्यामुळं जुन्या वड्यांचा मुद्दा इथल्या निवडणुकीत महत्वाचा असणार आहे. भाजपची स्थती इथं मजबूत दिसत असली तरी पक्षांतर्गत गटबाजीही अनेकवेळा दिसून आली आहे. याच गटबाजीतून महापालिका निवडणुकीत गणेश बिडकर यांचा पराभव घडवून आणण्यात आला. आता गणेश बिडकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीचा उपयोग करून कसब्याची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याचवेळी त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धकही सक्रिय झालेत. काँग्रेसमध्येही रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोन नगरसेवकांमध्ये चुरस आहे . या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची फारशी ताकत नसल्याने नेहमीप्रमाणे भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार हे जवळपास निश्चित आहे . भाजपमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत . तर भाजपमधील नाराजांचा फायदा उठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget