Kalyan Dombivali Ward Reservation: कल्याण डोंबिवलीच्या ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर; मातब्बर सुरक्षित, मात्र चुरस वाढणार
Kalyan Dombivali : Kalyan Dombivali municipal corporation elections 2022
Kalyan Dombivali Ward Reservation : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 टक्के निकषानुसार आज ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षण सोडत काढण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेची यंदाची निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होत आहे. यासाठी एकूण 44 प्रभागात 133 लोकप्रतनिधी निवडून येणार असून त्यामध्ये 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. त्यातही अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 (पैकी 7 महिला), अनुसूचित जमाती 4 (पैकी 2 महिला ) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून 35 (पैकी 18 महिला) तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 (पैकी 40 महिला) लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत.
मातब्बर सुरक्षित मात्र चुरस वाढणार
सोडतीत पालिकेतील मातब्बरांच्या प्रभागातील एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिली असली तरी दोन जागा आरक्षित झाल्या आहेत. पालिकेत तब्बल चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले मल्लेश शेट्टी यांचे प्रभागातील तिन्ही जागा आरक्षित झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागनार आहे. प्रत्यक्षात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आगरी कोळी समाजाचा वरचष्मा असल्याने पालिकेत निवडून येणारे सर्वधिक नगरसेवक ओबीसी प्रवर्गातील आहे. त्यांना खुल्या प्रवर्गातून लढण्याची देखील संधी असते. आरक्षण सोडतीनुसार कल्याण डोंबवलीतील मातब्बर नगरसेवक सुरक्षित झाले आहेत. मात्र खुल्या प्रवर्गातील निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे
ओबीसीसाठी कोणत्या प्रभागात आरक्षण
1 अ, 3 अ, 8 अ , 9 अ, 10 अ, 11 अ, 12 अ, 13 अ, 14 अ , 16 अ, 18 अ , 24 अ, 26 ते 42 अ आणि 44 ब हे 35 प्रभाग ओबीसी उमेदवारांकरीता आरक्षित करण्यात आले आहेत. त्यापैकी 22 ब, 2 ब, 5 ब, 44 ब, 1 अ, 2 ब, 3 अ, 5 ब, 8 अ, 11 अ, 12 अ, 13 अ, 18 अ, 22 ब, 27 अ, 28 अ, 30 अ, 33 अ, 35 अ, 36 अ, 40 आणि 44 ब प्रभाग ओबीसी महिला उमेदवारांकरीता आरक्षित झाले आहेत.
खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित
1 ब, 3 ब, 4 ब, 7 ब, 8 ब, 11 ब, 12 ब, 12 ब, 13 ब, 18 ब, 20 ब, 23 ब, 27 ब, 28 ब, 30 ब, 33 ब, 35 ब, 36 ब, 40 ब, 44 क, 9 ब, 10 ब, 14 ब, 15 ब, 16 ब, 21 ब, 24 ब, 25 ब, 27 ब, 29 ब, 31 ब, 32 ब , 33 ब, 34 ब, 35 ब, 36 ब, 37 ब, 39 ब, 40 ब, 41 ब,
खुल्या प्रवर्गातील अनारक्षित प्रभाग
1 ते 4 क, 6 ते 40 क आणि 44 क हे प्रभाग अनारक्षित आहेत.
अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी
2 अ, 15 अ, 19 अ, 22 अ, 25 अ, 44 अ
अनुसूचित जाती महिला
4 अ, 6 अ, 7 अ, 17 अ, 20 अ, 23 अ, 43 अ
अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्ग
5 अ, 21 अ
अनुसूचित जमाती महिला
6 ब, 19 ब