एक्स्प्लोर

Indurikar Maharaj Mother in Law : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा डंका, शशिकला पवार निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान

Sangamner Nilwande Gram Panchayat Election Result 2022 : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी शशिकला शिवाजी पवार यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्या संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) सासूबाई (Mother-in-Law) सरपंचपदी (Sarpanch) विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार (Shashikala Shivaji Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत (Nilwande Gram Panchayat) निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत.

इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान

शशिकला पवार या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सासूबाई (Indurikar Maharaj Mother in Law) आहेत. शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला आहे. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणाऱ्या शशिकला पवार भाजपला पाठिंबा देणार असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे. मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुक निकालाचा गुलाल

राज्यभरात विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीची आज मतमोजणी आहे. सार्वत्रिक निवडणुकीतून थेट सरपंचाची निवड झाली आहे. राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही जागांवरील विजयी उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत.

कोण आहेत इंदोरीकर महाराज? ( Who is Indurikar Maharaj? ) 

इंदोरीकर महाराज हे प्रसिद्ध किर्तनकार आहे. इंदोरीकर महाराज त्यांच्या मिश्लिक अंदाजातील किर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. इंदोरीकर महाराज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदोरीकर महाराज' असं नाव पडलं.

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींचे निकाल

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींपैकी सातव्या फेरीअखेरपर्यंत 33 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात गटाने 25 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 8 ग्रामपंचायती आल्या आहेत. विखेंनी जोर्वे ग्रामपंचायतीची जागा पटकावून थोरातांना धक्का दिल्यानंतर आता विखेंच्या ताब्यातील निमगाव जाळी ग्रामपंचायत पटकावित थोरातांनी परतफेड केली आहे.

संगमनेर एकुण ग्रामपंचायत - 37
जाहिर निकाल - 33
काँग्रेस - 25
भाजप - 08

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
Right To Vote : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget