एक्स्प्लोर

बदल घडविणाऱ्या हिंगणघाट मतदारसंघात कोणाच पारडं जड?

काही निवडक म्हणजे जेमतेम दोन आमदारांचा अपवाद सोडला तर हिंगणघाटचे मतदार कधीही आमदार रीपीट करत नाहीत,अशी ख्याती आहे. हिंगणघाटची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघाने शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेल्या शरद जोशींनाही इथून पराभव स्वीकारावा लागलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजप आमदाराने अन्य उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे तर तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 1985 नंतर इथे कधीही काँग्रेसला यश मिळालं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागील निवडणुकीत इथे भाजपचं कमळ फुललं. हा मतदारसंघ सातत्यान बदल घडवणारा अशी ओळख आहे. दोन आमदारांचा अपवाद सोडला तर हिंगणाघाटच्या मतदारांनी कधीही आपल्या आमदाराला दुसऱ्यांदा निवडून दिलं नाही.

शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखल्या जाणारे, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनाही पराभव दाखवणारा हा मतदारसंघ. शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपाचं कोड सुटलं की आघाडीचेही उमेदवार स्पष्ट होताच निवडणुकीला रंगत येईल. यावेळी इथे भाजपचं कमळ पुन्हा खुलणार की राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.
बदल घडविणाऱ्या हिंगणघाट मतदारसंघात कोणाच पारडं जड?
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) ही महत्त्वाची शहरे आहेत. यातील हिंगणघाट ही मोठी बाजारपेठ आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती समजली जाते. वार्षिक कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीवर सहकार गट म्हणजेच आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. पण नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे बहुतेक सर्कल भाजपच्या ताब्यात आहेत. कधी काळी हा भाग शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. शेतकरी संघटनेचे मोठे नेते येथून उदयास आले. पण, वसंतराव बोंडे वगळता शेतकरी संघटनेच्या कोणालाही या मतदारसंघात फारसं राजकीय यश मिळालं नाही. शेतकरी नेते वसंतराव बोंडे दोनवेळा, शिवसेनेचे अशोक शिंदे हे तीनवेळा येथून आमदार राहिले आहेत. इतरांना मात्र अशी संधी मिळाली नाही.
या मतदारसंघाच्या भूतकाळात डोकावल्यावर काय दिसतं. 1962 मध्ये विनायक चौधरी हे अपक्ष आमदार निवडून आले. 1967 ते 1985 पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिलेत. यात 1985 मध्ये वसंतराव बोंडे हे शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर या मतदारसंघात मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला कायम हाताची मूठ बांधून घेतली. शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने वसंतराव बोंडे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले. 1995 मध्ये शिवसेनेकडून अशोक शिंदे यांनी भगवा फडकवला. यावेळी त्यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा अशोक शिंदे विजयी झाले. यावेळी अशोक शिंदे यांना शिवसेना-भाजप सरकारमध्ये उद्योग राज्यमंत्रीपद मिळालं होतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू तिमांडे विजयी झाले. 2009 मध्ये अशोक शिंदे यांनी पुन्हा बाजी मारली. यावेळी अपक्ष म्हणून समीर कुणावार दुसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपकडून रिंगणात उतरताना समीर कुणावार यांनी तब्बल 65 हजार अशा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून कमळ खुलवलं. त्यांनी पाच वर्षाच्या सत्ताकाळात मतदारसंघात विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक कामे, अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हिंगणघाटचा पुन्हा संधी न देण्याचा इतिहास पाहता ही निवडणूक कुणालाही सोपी जाणारी नाही.
हिंगणगाटच्या जागेसाठी शिवसेना करू शकते दावा
शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे हे सर्वाधिक तीन वेळा येथून आमदार राहिले आहेत. त्यामुळे इथे तिकीटाकरिता शिवसेना दावेदारी करू शकते. भाजपला जागा सोडायची नसल्यास शिवसेनेला देवळी मतदारसंघाचा पर्याय दिला जाऊ शकतो असाही सूर ऐकायला मिळत आहे.
अंतर्गत गटबाजी
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षात येथे अंतर्गत गटबाजी आहे. हिंगणघाट पालिकेतील काही नगरसेवक, काही पदाधिकाऱ्यांत सुप्त नाराजीचे सूर ऐकायला मिळतात. युती झाली तरी ज्याचं तिकीट कटेल तो युतीच्या उमेदवाराचं काम करेल का, याविषयी कुणालाच खात्री देता येत नाही. बसपाची मतेही परिणाम करणारी असतील. मनसे जोरात नसली तरी राजकीय महत्वाकांक्षा ठेवून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार राजू तिमांडे यांच्या पुढे सहकार नेते, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांचं आव्हान असणार आहे. अॅड कोठारी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क त्यांची दावेदारी प्रबळ करणारा ठरतो.
हिंगणघाटसाठी 2014 ची निवडणूक ही आगळी वेगळी होती. या निवडणुकीत भाजपने सर्वच उमेदवारांची अमानत रक्कम जप्त केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनुक्रमे तिसऱ्या चवथ्या क्रमांकावर ढकलत बहुजन समाजवादी पक्षाचे प्रलय तेलंग हे दुसऱ्या क्रमांकावर आले. या निवडणुकीनंतर प्रलय तेलंग यांचा नगर पालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने बहुजन समाज पक्षाकडून त्यांचे नाव मागे पडले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अनिल जवादे यांची उमेदवारी ही अनेक छोट्या मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याने केली जाऊ शकते. अनिल जवादे हे देखील मोठं आव्हान उभे करू शकतात.
लोकसभेत भाजप उमेदवाराला सर्वाधिक आघाडी
लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगणघाट मतदारसंघातून सर्वाधिक 38 हजार 278 एवढं मताधिक्य मिळालं होतं. लोकसभेत भाजपचे रामदास तडस यांना 103610 तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना 65332 मते मिळाली.
मागील निवडणुकीत मिळालेली मतं
समीर कुणावार (भाजप) 90275 प्रलय तेलंग (बसपा) 25100 राजू तिमांडे (राष्ट्रवादी काँग्रेस) 23083
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP MajhaSatish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलंABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSatish Bhosale House : धक्कादायक! अज्ञातांनी पेटवून दिला सतीश भोसलेच्या घराबाहेरचा परिसर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Bank Holiday : बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही 'या' राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार
Bank Holiday : बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही 'या' राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
Embed widget