Goa Election Result : गोव्यात 342 मतांसह गोविंद गोवेंकर ठरले सर्वाधिक मतं घेणारे शिवसेना उमेदवार
Goa Election Result : वा विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
![Goa Election Result : गोव्यात 342 मतांसह गोविंद गोवेंकर ठरले सर्वाधिक मतं घेणारे शिवसेना उमेदवार Goa Election Result 2022 Shivsena Govind Govenkar got higest votes Goa Election Result : गोव्यात 342 मतांसह गोविंद गोवेंकर ठरले सर्वाधिक मतं घेणारे शिवसेना उमेदवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/10/3c1ce195152e1b23fa3878770bb17c88_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Goa Election Result : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवू असं म्हणणाऱ्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना मतदारांनी नाकारलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना तर नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. गोविंद गोवेंकर हे शिवसेनेचे उमेदवार सर्वाधिक म्हणजे 342 मतं घेण्यामध्ये यशस्वी ठरली आहे.
गोव्यात भाजपने 20 जागांवर आघाडी घेतली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या मदतीला तीन अपक्ष आणि मगो पक्षाचे दोन आमदार धावले आहेत. काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलंय.
शिवसेना उमेदवारांना मिळालेली मतं
1. अल्दोना- गोविंद गोवेंकर- 342
2. कोर्टलिम- भक्ती खडपकर- 55
3. मेंद्रेम - बबली नाईक- 116
4. माफसा- जितेश कामत- 123
5. पेर्नेअम- सुभाष केरकर- 222
6. पोरियम- गुरुदास गावकर- 265
7. क्वेपम- अॅलेक्सी फर्नांडिस- 66
8. सॅन्क्लिअम- सागर धरगलकर- 97
9. सिओलियम- करिश्मा फर्नांडिस- 166
10. वालपोई- देविदास गावकर- 183
11. वास्को- मारूती शिरगावकर- 71
राष्ट्रवादी उमेदवारांना मिळालेली मतं
1. मारकेम- रविंद्र तलौलीकर- 137
2. शेख मोहम्मद अकबर- 56
3. नावेली- मोहम्मद रिहान मुजावर- 2609
4. नुवेम- पाचेको फ्रान्सिस झेविअर- 2035
5. पोर्वोरिअम- शंकर फाटे- 154
6. प्रिओल- दिग्विजय मधु वेलिंगकर- 156
7. क्वेपम- अॅलोसिस डिसिल्व्हा- 233
8. संगिअम- डोमॅसिओ बॅरोटो- 174
9. सिरोडा- सुभाष प्रभुदेसाई- 564
10. सेंट आंद्रे- इस्टेव्हन डिसुझा- 128
11. गॉडफ्रे डिलेमा- 69
12. वेलिम- फिलिप नेरी रॉड्रीगेस- 3296
गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25 टक्के मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. 1.17 टक्के मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला आहे.
संबंधित बातम्या :
- Goa Election Result 2022 : तीन अपक्षांनंतर 'मगोपा'चे भाजपला समर्थन, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
- Goa Election Result 2022: गोव्यात भाजपचं कमळ, ममता बॅनर्जींच्या TMC पक्षाची कशी होती कामगिरी?
- Goa Election Result 2022 : आपची गोव्यातही एन्ट्री, दोन उमेदवार विजयी, शिवसेना-राष्ट्रवादीचा दारुण पराभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)