(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Election Result 2022: गोव्यात भाजपचं कमळ, ममता बॅनर्जींच्या TMC पक्षाची कशी होती कामगिरी?
Goa Election Result 2022: गोव्यात भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक जागांवर विजय मिळवला असून ममता बॅनर्जींची जादू मात्र गोव्यात चालू शकलेली नाही.
Goa Election Result 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election Result 2022) यंदा नशीब आजमवणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाला (Congress) खास कामगिरी करता आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार टीएमसी कोणत्याही जागेवर आघाडी घेऊ शकलेली नाही. गोवा विधानसभेसह (Goa Assembly Election) इतर चारही राज्यातील निवडणूकांचे निकाल सकाळपासूनच समोर येत आहेत. यात पंजाब वगळता चारही राज्यात भाजपने आपली छाप सोडत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजयी रक्ष थांबवणाऱ्या ममत बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला गोव्यात मात्र जादू दाखवता आलेली नाही.
गोव्यात पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेस (TMC) निवडणूक लढवत आहे. पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवरील माहितीनुसार टीएमसी एकही जागेवर आघाडी घेऊ शकलेली नाही. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भाजपने सर्वाधिक 20 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस 10, आप, गोमंतक यांनी प्रत्येकी 2 आणि जागांवर विजयी आहे. याशिवाय अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.
टीएमसीने पराभव मान्य केला
टीएमसी गोवा पक्षाने (TMC in Goa) त्यांच्या ट्वीटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही जनतेचा हा आदेश विनम्रपणे मान्य करतो. आम्ही गोवा वासियांचा विश्वास आणि प्रेम मिळवण्यासाठी आणखी कसून मेहनत करु. आम्हाला कितीवेळ लागेल याने फरक पडत नाही. पण आम्ही जनतेची सेवा कायम ठेवू.''
हे ही वाचा-
- Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर, जाणून घ्या कोण आहेत ते..
- Goa Election Results 2022: मुख्यमंत्र्यांनी गड राखला, दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत!
- Manipur Election Result 2022: मणिपूरमध्ये भाजपचं कमळ फुललं, पाहा विजयी उमेदवारांची यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha