एक्स्प्लोर
राजकारणातील वाऱ्याचा वेग पवारांनी ओळखला : गिरीश महाजन
पवार बारामतीत जिंकले तर लोकशाही जिवंत आम्ही जिंकलो तर लोकशाही धोक्यात याला काही अर्थ नसल्याचंही गिरीश महाजन म्हणाले.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पराभवाची चाहूल लागली आहे. असं म्हणतात पवार राजकारणातील वाऱ्याचा वेग लवकर ओळखतात अशी त्यांची खासियत आहे. त्यामुळेच ते ईव्हीएकडे बोट दाखवत असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
बारामतीमधून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांकडून बारामतीची जागा जिंकण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला जात होता. त्याबद्दल बोलताना पवारांनी 'जर बारामती भाजपनं जिंकली तर लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल', असं खळबळजनक विधान केलं आहे. यावर महसूल मंत्री गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली.
VIDEO | बारामतीच्या जागेवरुन शरद पवारांना ईव्हीएम यंत्रणेवर शंका? | एबीपी माझा
पवार प्रभावाच्या मानसिकतेतून असे बोलत असून पराभवाआधी कारण तयार ठेवत असल्याचा पलटवार महाजन यांनी केला आहे. तसेच पवार बारामतीत जिंकले तर लोकशाही जिवंत आम्ही जिंकलो तर लोकशाही धोक्यात याला काही अर्थ नसल्याचंही महाजन म्हणाले. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करता आली असती तर आम्ही चार राज्यात हरलो नसतो. पराभवानंतर आम्ही असं म्हटलं नाही की काँग्रेसने मशीन मशीनमध्ये छेडछाड केली आहे असंही महाजन म्हणाले.
VIDEO | बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार | एबीपी माझा
संबंधित बातम्या
बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार
शरद पवारांना बारामतीचा पराभव समोर दिसू लागलाय : चंद्रकांत पाटील
कुटुंबावर बारामतीच्या पराभवाचं खापर नको म्हणुन पवारांचं ईव्हीएमकडे बोट : विनोद तावडे
राज ठाकरेंच्या सभांचा भाजपला फायदा झाला, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement