Video: मराठवाड्यात खळबळ, मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डांचा ढीग; निवडणूक अधिकारी पळतच आले
शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली.
![Video: मराठवाड्यात खळबळ, मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डांचा ढीग; निवडणूक अधिकारी पळतच आले Excitement in Marathwada lok sabha election, pile of voting cards found before voting in jalana; Election officials came running marathi news Video: मराठवाड्यात खळबळ, मतदानापूर्वीच आढळला मतदान कार्डांचा ढीग; निवडणूक अधिकारी पळतच आले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/79c55631f7bba3d19e82f5ef1ca6311417153356452551002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील पहिल्य तीन टप्प्यात मतदान उत्साहात पार पडले. राजकीय नेत्यांच्या सभा, उन्हासह प्रचाराचा धुमधडाका आणि गाठीभेटींसाठी उमेदवारांची होणारी लगगब सर्वत्र दिसून आली. तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह (Marathwada) पश्चिम महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान पार पडले. यावेळी, सांगोल्यातील मतदान केंद्रावर चक्क ईव्हीएम मिशन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. काही ठिकाणी बोगस मतदानाचाही प्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच, आता चौथ्य टप्प्यातील मतदानापूर्वीच जालन्यात (Jalana) बेवारस मतदान पत्रे (Voting) चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, अद्याप येथील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही.
शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली. याबाबत माहिती मिळताच निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थलावरुन धाव घेऊन ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना गुरुवारी सकाळी परिसरात मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आले. याबाबत, त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला.
कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ही मतदार ओळखपत्रे अज्ञात व्यक्तीने टाकलेली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा पुढील तपास सुरू केला आहे. सापडलेल्या ओळखपत्रांची नावे बीएलओमार्फत तपासणीचे काम सुरू करण्यात आले असल्याचे माहितीही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. मात्र, मतदानापूर्वीच येथे अशाप्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे.
#WATCH | Jalna, Maharashtra | Voter cards found in the garbage, investigation underway. pic.twitter.com/YB8yqH1jOL
— ANI (@ANI) May 10, 2024
रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याणराव काळे
दरम्यान, जालना लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होत आहेत. येथील लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रावसाहेब दानवे तर महाविकास आघाडीकडून कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत होत आहे. तर, मराठा आरक्षणाचा मुद्दा याच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून राज्यभर पुन्हा पेटला होता. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट येथील मतदारसंघात होऊ शकतो, असे चित्र दिसून येते.
हेही वाचा
Beed : मराठा वि. ओबीसी संघर्षातच पंकजा मुंडेंचा व्हायरल कॉल, बीडची निवडणूक जातीयतेत अडकली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)