एक्स्प्लोर

Punjab Election Result : 'आधी दिल्ली, आता पंजाब मग संपूर्ण देशात इन्कलाब होणार', विजयानंतर केजरीवालांचा एल्गार

Arvind Kejriwal reaction Punjab Election Result : 'केजरीवाल देशभक्त आहे दहशतवादी नाही हे आजच्या निकालातून देशानं दाखवून दिलंय', असं म्हणत विजयानंतर अरविंद केजरीवालांनी एल्गार केलाय.

Arvind Kejriwal reaction Punjab Election Result  : :  देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आम आदमी पार्टीने (AAP)मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे. या विजयावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आधी दिल्ली, आता पंजाब मग संपूर्ण देशात इन्कलाब होणार' असं म्हणत विजयानंतर केजरीवालांनी एल्गार केला आहे. 

केजरीवाल म्हणाले की, सगळे मोठे दिग्गज आज पंजाबमध्ये हरले. कॅप्टन हरले, नावजोत सिद्धू हरले, सीएम चन्नी हरले.  कमाल झाली आहे.  डॉ. आंबेडकर आणि भगतसिंहांचं स्वप्न पूर्ण करतोय.  आपच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले. कुणीही येऊ द्या पण आप येऊ नये यासाठी षडयंत्र केलं गेलं.  मलाला दहशतवादी सुद्धा म्हटलं गेलं. आज मात्र जनतेने दाखवून दिलं की केजरीवाल दहशतवादी नाहीये तर तुम्ही दहशतवादी आहात जे लोकांना लुटत आहेत, असा टोला केजरीवालांनी विरोधकांना लगावला. 

केजरीवाल म्हणाले की, आज संकल्प करूया की आपण असा भारत बनवूया सर्वांना शिक्षण चांगलं मिळेल, गरिबी श्रीमंतीची दरी दूर होईल.  दिल्लीला इन्कलाब झाला. नंतर पंजाबला झाला आता भारतात सुद्धा करायचा आहे, असं ते म्हणाले.  मोबाइल रिपेअर करणाऱ्या कर्मचाऱ्याने आज पंजाबच्या मुख्यमंत्र्यांला हरवलं.  आम आदमी खूप मोठी ताकद आहे,  मी भगवंत मानचं अभिनंदन करतो. ते आता मुख्यमंत्री होत आहेत.  निवडणुकीत मला खूप शिव्या दिल्या, पण आपल्याला सेवेची राजनीती करायची आहे, असं ते म्हणाले. 

केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, या सत्तांतरासाठी पंजाबच्या नागरिकांचं खूप खूप आभार मानतो. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. 

पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला

पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 12 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 10  जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप मात्र निष्प्रभ दिसून येत आहे. 

काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं? 

काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.    

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

संबंधित बातम्या

Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर

Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर

Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget