एक्स्प्लोर

Punjab Election Result 2022 : पंजाबमध्ये आपची धडाकेबाज एन्ट्री! काँग्रेसचा सुपडा साफ, भाजप निष्प्रभ... आपच्या यशाचं कारण काय?

Punjab Election Result 2022 : पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे. आपनं जोरदार मुसंडी मारली आहे, याचं कारण काय?

5 State Election Results 2022 LIVE:पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत.  देशातील या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.  या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP)मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप तब्बल 89 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन देखील आपनं सुरु केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 12 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 10  जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजप मात्र निष्प्रभ दिसून येत आहे. 

काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं? 

काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.  

भाजपवर नाराजीचं कारण काय?

ऐतिहासिक शेतकरी आंदोलनातील पंजाबचा सहभाग जास्त होता. त्यामुळं भाजपवर लोकांची नाराजी सहाजिकच होती. याचा फटका भाजपला बसला.  पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. याचा फायदा आपला झाल्याचं दिसून येत आहे. पंजाबमध्ये सत्ता आल्यास आपला सत्ता मिळालेलं हे दुसरं राज्य असेल. भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये सत्ता येणार असल्याचा दावा अनेकदा केला होता. तसेच पंजाबमध्ये आपनं मोठी ताकत लावली होती.  पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117  जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजाबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता.  

2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? - 
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. 

पंजाबमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?  

चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिब
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौर
नवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्व
विक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्व
भगवंत मान (आप) - धुरी
कॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहर
प्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबी
सुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबाद
सुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानक
मालविका सूद (काँग्रेस) - मोगा

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

संबंधित बातम्या

Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर

Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर

Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget