एक्स्प्लोर

Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!

5 State Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. आता सुरुवातीचे कल हाती येत असून या कलांमध्ये भाजपनं बहुतांश ठिकाणी आघाडी घेतल्याचं कळतंय.  

5 State Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. आता सुरुवातीचे कल हाती येत असून या कलांमध्ये भाजपनं बहुतांश ठिकाणी आघाडी घेतल्याचं कळतंय.  

उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 200 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 80 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपनं चांगलीच मुसंडी मारल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय. आप 45 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 17 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय.

उत्तराखंडमध्ये 35 पेक्षा जास्त जागांवर भाजप तर काँग्रेस 20 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आतापर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय.

( हे आकडे सकाळी 9 वाजेपर्यंतचे आहेत. काही वेळातच सर्व आकडेवारी स्पष्ट होणार आहे)

देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया

देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.

उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं. 

पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे  निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 

दरम्यान, एक्झिट पोलमधून उत्तराखंड आणि गोव्यात चुरशीच्या शर्यत पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुतेकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि यूपी आणि मणिपूरमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. 

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget