एक्स्प्लोर
Advertisement
नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अमित शाह यांच्याविरोधात निवडणूक आयोग आज सुनावणी करणार
आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निवडणूक आयोगाला सुनावणीचे निर्देश द्यावेत, यासाठी सुष्मित देव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या दोघांवर प्रक्षोभक भाषण आणि सैन्याचा वापर राजकीय प्रचारासाठी केल्याचा आरोप आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणावर आज निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (29 एप्रिल) स्वीकारुन, मंगळवारी (30 एप्रिल) त्यावर सुनावणी करण्यास मंजुरी दिली. यानंतर निवडणूक आयोगाने सुनावणीबाबत घोषणा केली.
आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निवडणूक आयोगाला सुनावणीचे निर्देश द्यावेत, यासाठी सुष्मित देव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या दोघांवर प्रक्षोभक भाषण आणि सैन्याचा वापर राजकीय प्रचारासाठी केल्याचा आरोप आहे.
सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सिंघवींच्या याचिकेची दखल घेतली
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली आहे. या याचिकेत आसामच्या सिलचरमधील काँग्रेस खासदार आणि 'ऑल इंडिया महिला काँग्रेस'च्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी मोदी आणि शाह यांच्याविरोधातील आचारसंहितेचं उल्लंघनाच्या तक्रारींवर त्वरित सुनावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली होती.
आयोगाने 40 तक्रारींवर सुनावणी केलेली नाही, काँग्रेसचा आरोप
सुष्मिता देव यांच्या आरोपांनुसार, "भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरोधातील तक्रारींवर निवडणूक आयोगाने कारवाई न करणं हे भेदभावाचं प्रतीक आहे. ही मनमानी आणि अन्यायकारक वागणूक निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेसाठी धोकादायक आहे. भाजप नेते चार आठवड्यांपासून आचारसंहितेचं उल्लंघन करत आहेत, मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 40 तक्रारींवर कोणतीही सुनावणी केली नाही."
अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस नेत्यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा आचारसंहितेचं उल्लंघन केलं असून त्यांच्यावर 48 ते 72 तास निवडणूक प्रचारासाठी बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
राजकारणासाठी पंतप्रधानांकडून सैन्य, जवानांचा वापर करत, काँग्रेसचा आरोप
'आम्ही निवडणूक आयोगासमोर ती महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले 40 जवान आणि बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकच्या नावावर मतं मागत आहेत. पंतप्रधान राजकारणात सैन्याला आणत आहेत. हे घटनाबाह्य आहे, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी भेटीनंतर सांगितलं.
भाजपची राहुल गांधींविरोधात तक्रार
दुसरीकडे भाजपच्या एका गटानेही मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांच्याकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तक्रार केली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, "राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात सातत्याने करत असलेली विधानं आचारसंहितेचं उल्लंघन आहे. राहुल गांधी आमच्या पक्षाला मारेकरी म्हणाले, जे निवडणूक कायद्याच्या विरोधात आहे. राहुल गांधी 'गाली गँग'चा भाग बनत आहेत, जे एका लोकशाही देशात असभ्य समजलं जातं. त्यांचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत."
"निवडणूक आयोगाने राहुल गांधींवर आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही सीडी, भाषणाची स्क्रिप्ट आणि इतर पुरावे त्यांच्याकडे सादर केले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करायला हवी," असंही मुख्तार अब्बास नकवी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
Advertisement