Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा, अन्यथा..! शिवसेना शिंदे गटाचा इशारा
Sanjay Bhor on Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून राजकारण रंगताना दिसत आहे.
Sanjay Bhor on Eknath Shinde, मुंबई : "विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत...महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाचे मोठे आंदोलन झाले तरी देखील विधानसभा निवडणुकीत मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीच्या मागे उभा राहिला. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच असावेत. अन्यथा येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मराठा समाज महायुतीपासून दूर जाईल असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केलीये. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
मुख्यमंत्रिपदावरुन सुषमा अंधारेंनी भाजपला डिवचलं
दरम्यान, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्रिपदावरुन भाजपला काही सवाल केले आहेत. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे ,पंकजा मुंडे या ओबीसी नेत्यांचा भाजप मुख्यमंत्री पदासाठी विचार करणार ? की भाजपमधील ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षा होणार? मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवताना त्याच त्या नावावर खल का व्हावा? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे.
_ मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवताना त्याच त्या नावावर खल का व्हावा?
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 25, 2024
_स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी भाजपा शिंदे, अजित पवार यांना इतक्यात दुखावणार नाही असे दिसते. @cbawankule @SMungantiwar @Pankajamunde या OBCनेत्यांची कायमच उपेक्षा का व्हावी?@PTI_News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत मोठं यश मिळावल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
अजित पवार मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
प्रत्येकाने आपल्या जवळ काय आहे हे पाहायला पाहिजे. आमची काळजी करू नये. आमची काळजी करायला आमचे आमदार, महायुती, माझ्या पक्षासोबत असणारे नेते, कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या