एक्स्प्लोर

Eknath Shinde Resigned: एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या उपस्थितीत राजीनामा सोपवला!

Eknath Shinde Resigned: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सुपूर्द केला.

Eknath Shinde Resigned मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा (Eknath Shinde Resigned) सुपूर्द केला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्ती, राज्यपालांनी दिलं पत्र-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिलं आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोणा होणार, याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत आहे.

30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रि‍पदाची घेतली होती शपथ-

शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले होते. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईत परतले  होते.  यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरु असताना महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक  मुख्यमंत्रीपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.

राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, Video:

संबंधित बातमी:

Maharashtra Next CM: नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हे...महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण निवडणार?, अखेर नाव आलं समोर, 29 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Embed widget