एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘या’ कारणामुळे भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही?
लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चेसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 16 तारखेला रात्री पार पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास आठ तास ही बैठक चालली. पण अद्याप भाजपची कोणतीही यादी जाहीर झालेली नाही.
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची याद्या जाहीर होत असताना मात्र भाजपने अद्याप आपली उमेदवार एकही यादी जाहीर केलेली नाही. निवडणुकीचा पहिला टप्पा तोंडावर असताना यादी जाहीर करण्यासाठी भाजप शुभ मुहूर्ताची वाट पाहतोय का? असाही प्रश्न पडू लागला आहे.
14 मार्चपासून हिंदू कॅलेंडरमधील ‘होलाष्टक’ सुरु झालं आहे. या काळात कुठलंही शुभकार्य करणं वर्ज्य मानलं जातं. 14 ते 20 मार्च असा या होलाषटकाचा कालवधी आहे. त्यामुळे होळी आणि धुलिवंदन नंतरच भाजप आपल्या उमेदवारांची नावं घोषित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
VIDEO | महाराष्ट्रातल्या भाजपच्या पाच विद्यमान खासदारांचा यंदा पत्ता कट? | नवी दिल्ली | एबीपी माझा
लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चेसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 16 तारखेला रात्री पार पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास आठ तास ही बैठक चालली. पण अद्याप भाजपची कोणतीही यादी जाहीर झालेली नाही.
देशभरातील जवळपास 180 उमेदवारांचा या पहिल्या यादीत समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या यादीत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या उमेदवारांची नावं असण्याची शक्यता आहे. नागपुरातून नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची घोषणा होऊन शकते. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे देखील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणुकीत सध्या भाजपचे खासदार असलेल्या अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
सातत्याने भाजपविरोधी बोलणारे शत्रुघ्न सिन्हा यांच्या जागी रविशंकर प्रसाद यांना पाटण्यातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश पश्चिममधून किरण रिजीजू मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO | निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष असू शकेल मात्र मोदी पंतप्रधान नसतील : शरद पवार | एबीपी माझा
संबंधित बातम्या
उमेदवारी अर्ज भरण्याची शुभ वेळ काय? इच्छुकांची पावलं ज्योतिषांकडे
सोमय्यांसह महाराष्ट्रातील भाजपच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट?
भाजपची पहिली यादी आज किंवा उद्या, अनेक पक्षातले मोठे नेते भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
'हा' उमेदवार नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement