Raj Thackeray: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन, सोहळ्याचं आमंत्रणही दिलं, पण....
Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुून राज ठाकरेंना निमंत्रीत केल्याची माहिती होती. पण राज ठाकरे या सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
मुंबई: आज मुंबईत आझाद मैदानावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती असणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे, शरद पवार, राज ठाकरे (Raj Thackeray), उध्दव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुून राज ठाकरेंना निमंत्रीत केल्याची माहिती होती. पण राज ठाकरे (Raj Thackeray) या सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शपथविधीचं खास निमंत्रण देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, काही व्यक्तिगत कारणामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आलेली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात परवा चर्चा झाली होती. त्यांना निमंत्रण देखील पाठवण्यात आलं होतं. त्याचबरोबर दोघांची फोनवरून चर्चा झाली होती. राज ठाकरे यांच्या पारिवारिक भेटीगाठी ठरलेल्या असल्यामुळे आणि ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती देत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी चांगल्या काम करावं यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच मैत्री वाढली होती. लोकसभेवेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली. त्याचबरोबर राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन करून निमंत्रण दिलं असलं, तरी राज ठाकरे सोहळ्याला उपस्थित नसणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांना फोन
आजच्या शपथविधीला राज्यातील बड्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून निमंत्रण दिलं आहे. मात्र, काही नेते वैयक्तीक कारणास्तव आणि राज्यसभेच्या अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती आहे. आज होणाऱ्या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना निमंत्रण दिलं आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला येणार नाहीत अशी माहिती आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत
माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथविधीचा निमंत्रण दिला असल्याची माहिती आहे. मात्र, ते शपथविधी कार्यक्रमाला ठाकरे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे.