Goa Election 2022: राहुल गांधी यांना मोदी फोबियाचा त्रास ; अमित शाह यांचा हल्लाबोल
Goa Election 2022 : "गोव्यातील जनतेला भाजपचा ‘गोल्डन गोवा’ आणि काँग्रेसचा ‘गांधी घराण्याचा गोवा’यापैकी एकाची निवड करावी लागेल. राहुल गांधी यांना 'मोदी-फोबिया'चा त्रास आहे, अशी टीका अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

Goa Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "गोव्यातील जनतेला भाजपचा ‘गोल्डन गोवा’ आणि काँग्रेसचा ‘गांधी घराण्याचा गोवा’ यापैकी एकाची निवड करावी लागेल. राहुल गांधी यांना 'मोदी-फोबिया'चा त्रास आहे, अशी टीका अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
अमित शाह आज एकदिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात त्यांनी जाहीर सभांना मार्गदर्शन केले. त्याबरोबरच त्यांनी घरोघरी प्रचार केला. त्याआधी दाबोलीम विमानतळावर भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदरू शेट तानावडे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले.
Congress leader Rahul Gandhi suffering from Modi-phobia: Amit Shah
— Press Trust of India (@PTI_News) January 30, 2022
अमित शाह म्हणाले, "छोट्या राज्यांच्या विकासाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्राधान्य आहे. स्थिरता असल्यानंतरच विकास होऊ शकतो. भाजप गोव्याचा विकास करण्यासाठी कठिबद्ध आहे"
14 फेब्रुवारी रोजी होणार मतदान
दरम्यान, आगामी विधानसभेच्या निवडणुकांमुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. राज्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Goa Assembly Election 2022 : 'एकला चलो' धोरण काँग्रेसला पाडणार की तारणार?
गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत
Goa Election : भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण : उत्पल पर्रिकर




















