एक्स्प्लोर

गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत

Goa Assembly Elections 2022 : गोव्यासाठी शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले असून स्वतः आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Goa Assembly Elections 2022 : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं (Shivsena) आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 10 ते 12 जागी निवडणुक लढवणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. 

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय. गोव्यातील निवडणुका आम्ही 2017 मध्येही लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण, गोव्याच्या निवडणुका, एकंदरीत राजकारण हे काही आशादायी दिसत नाही, सर्वांसाठीच. गोव्याच्या जनतेसाठी. वातावरण पूर्ण गढूळ झालंय. अनेक राजकीय पक्ष नव्यानं उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढत आहेत, हेदेखील स्पष्ट होत नाही." 

"परवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रस पक्षासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत मी बोलताना म्हणालो, हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम-गयाराम हा शब्द प्रचलित आहे. पण गोव्याच्या बाबतीत म्हणायचं तर, आलेमाव-गेलेमाव. कारण काय, कधी कोण आले, कधी कोण गेल, कधी कोण बंड करेल, याचा काहीही नेम नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना निवडणूक लढत आहे. गोव्याचं राजकारण हे गेल्या काही वर्षांत 5 ते 10 लोकांच्या मुठीमध्ये आहे. मग हे भुमाफिया, दणदांडगे आणि राजकीय घराणी आहे. यामध्ये सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतंही स्थान राहिलेलं नाही. इतक्या भ्रष्ट पद्धतीनं गोव्याच्या निवडणुका लढल्या जातात आणि राज्य चालवलं जातं. म्हणूनच आम्ही ठरवलंय की, या प्रस्तापितांना घरी बसवायचं असेल, तर जनतेतील सामान्यातील सामान्य उमेदवारांना उमेदवारी द्यायची, जे आम्ही महाराष्ट्रात करतो. त्यामुळे त्या-त्या मतदार संघातील सामान्य चेहरे मैदानात उतरवायचं आम्ही ठरवलं आहे.", असं संजय राऊत म्हणाले. 

गोवा निवडणुकीत शिवसेना साधारण 10 ते 12 जागा लढेल : संजय राऊत 

"गोवा निवडणुकीत शिवसेना साधारण 10 ते 12 जागा लढेल. आज 9 उमेदवारांची यादी जाहीर करत आहोत. पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे. उरलेल्या तीन मतदार संघांची आम्ही लवकरच घोषणा करु.", असं संजय राऊत म्हणाले. "आम्ही ठरवलंय प्रत्येक मतदार संघात शिवसेना अत्यंत गांभिर्यानं आणि ताकदीनं निवडणुका लढवेल, गोव्याच्या राजकारणातील सध्याची जळमटं दबर करायची असतील, तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणं गरजेचं आहे. गोव्याच्या जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, भ्रष्टाचार, राजकारण्याची दंडलशाही हे सगळं जर थांबवायचं असेल, तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जाणं गरजेचं आहे. आणि गोव्याची जनता शिवसेनेला संधी देईल याची मला खात्री आहे.", असं राऊत म्हणाले. 

आदित्य ठाकरे प्रचारासाठी गोव्याच्या मैदानात

"महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. युवासेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. मतदान संघात ते काम करतील. काही मतदार संघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वतः प्रचाराला उतरतील.", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. "गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय, शिवसेनेला काही मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळतोय. गोव्याची जनता आम्हाला सांगतेय की, यंदा गोवा विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवणार.", असं संजय राऊत म्हणाले. 

"पणजीतून उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं आहे. कोणाला तिकीट द्यायचं का भाजपचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष, त्यांनी ठरवावं कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही. पण मनोहर पर्रिकरांच्या बाबतीत गोवेकरांच्या भावना वेगळ्या आहेत. माझ्या असं ऐकण्यात आलं आहे की, घराणेशाही हा निकष लावून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे, हे जर खरं असेल तर, वाळपयी, परये या ठिकाणी घराणेशाहीच आहे. त्यानंतर पणजी, तळेगाव येथेही घराणेशाही आहे. मग उत्पल पर्रिकर यांच्या बाबतीतच घराणेशाही आडवी आली? की, त्यांचं कर्तृत्त्व आडवं आलं? जर उत्पल पर्रिकर गोव्यातून निवडणूक लढवणार असतील, तर आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ आणि इतर पक्षांचंही त्यांना पाठिंबा देण्यासाठी मन वळवू.", असं संजय राऊत म्हणाले. 

जर उत्पल पर्रिकरांनी पणजीतून उमेदवारी अर्ज भरला, तर शिवसेना पूर्णपणे पाठिंबा देईल : संजय राऊत 

"जर उत्पल पर्रिकरांनी पणजीतून उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी शेवटपर्यंत तो अर्ज ठेवला आणि निवडणूक लढवण्याच्या मतावर ते ठाम राहिले. तर शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर आपली उमेदवारी मागे घेतील.", असं संजय राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget