एक्स्प्लोर

Karnataka Election: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्याच फैसला? डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांना दिल्लीला बोलावलं

Karnataka Election Result : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि काँग्रेस नेते सिद्धारमय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. 

Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना आजच बंगळुरुत बोलावण्यात आलंय. त्याचवेळी कर्नाटकातील राजकीय घटनांना वेग आला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि नेते सिद्धारमय्या यांना हायकमांडने आजच दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी या दोन नेत्यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती आहे. जे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालं ते कर्नाटकात होऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांडने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. 

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. पण त्याच सोबत आता काँग्रेसचे जेष्ठ नेते परमेश्वर आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नावही पुढे येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी या ठिकाणाहून सतिश जारकीहोळी हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे तेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे येऊ शकतात असं म्हटलं जातंय. 

कोण आहेत सिद्धरामय्या?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, हे आज स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचा विजय झाला तर राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. आज म्हणजेच 13 मे रोजी निवडणूक निकालानंतर काँग्रेसने 113 जागा मिळवून बहुमत मिळवलं तर सिद्धरामय्या हे काँग्रेसची पहिली पसंती असू शकतात.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात "सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून अनेक बदल घडवून आणले. त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरु केल्या. सात किलो तांदूळ देणारी अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम दूध देणारी क्षीर-भाग्य योजना आणि इंदिरा कॅन्टीनमुळे राज्यातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उपासमार, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू यांच्याशी लढण्यासाठी योजना आणल्या, ज्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, महिलांसाठी पंचायत अनिवार्य करणे आणि गर्भधारणेनंतर 16 महिन्यांपर्यंत महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध करुन देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आणल्या. मात्र सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काही निर्णय घेतले होते ज्यामुळे ते लिंगायत, विशेषतः हिंदू मतदारांमध्ये त्याची लोकप्रियता घटली होती 

कोण आहेत डीके शिवकुमार?

डीके शिवकुमार यांनी काल म्हणजेच 12 मे रोजी एक ट्वीट केलं होतं ज्यामधून त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी सांगितल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी डीके शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या तीन वर्षांच्या मेहनतीचा ट्रेलरचा व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.

डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवकुमार अनेक वर्षांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. 2018 च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!

व्हिडीओ

Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
Embed widget