एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभेत काँग्रेसला आवाजच उरला नाही
कसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या खासदारांची संख्या केवळ आठने वाढून 52 वर पोहोचली आहे. परंतु ही संख्या वाढण्यापूर्वी काँग्रेसने असे चेहरे गमावले आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या खासदारांची संख्या केवळ आठने वाढून 52 वर पोहोचली आहे. परंतु ही संख्या वाढण्यापूर्वी काँग्रेसने असे चेहरे गमावले आहेत, जे संसदेत काँग्रेसचा आवाज बनले होते.
काँग्रेसने गमावलेला संसदेतला पहिला चेहरा म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे. कर्नाटकमधील गुलबर्गा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खर्गे पराभूत झाले आहेत. त्यापाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे, हरियाणातील दीपेंदर सिंह हुड्डा, आसामच्या सुष्मिता सिंह या युवा नेत्यांना मोदी लाटेत पराभवाचा तडाखा बसला आहे.
खर्गे, शिंदे, हुड्डा ही मंडळी संसदेतील प्रत्येक चर्चेत सहभागी होत होती. लोकसभेत काँग्रेसची भूमिका मांडण्याचे काम हे नेते करत होते. त्यातही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेसचे भावी गटनेते म्हणूनही पाहिले जात होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे किमान राष्ट्रीय राजकारणातला रोल तरी प्रभावी राहील, असे ज्योतिरादित्य यांच्याबद्दल म्हटले जात होते. परंतु आता ते स्वत:च पराभूत झाल्याने तीही आशा मावळली आहे. शशी थरुर सोडले तर लोकसभेत काँग्रेसकडे एकही प्रभावी नेता, प्रभावी वक्ता नाही. त्यातही शशी थरुर यांच्या वक्तृत्वाला, कामकाजाला केवळ इंग्लिश वर्तुळापर्यंत मर्यादा आहेत.
2014 च्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या खासदारांचा आकडा 44 होता, परंतु काँग्रेसकडे खर्गे, ज्योतिरादित्य शिंदे, दीपेंदर हुड्डा, सुष्मिता सिंह, राजीव सातव, के. सी. वेणुगोपाल या आक्रमक नेत्यांची फौज होती. ही सगळी नेतेमंडळी सभागृहात आक्रमकपणे भाजपला लक्ष्य करत होती. राहुल गांधींच्या बाजूने खंबीरपणे उभी होती. परंतु राहुल गांधी लोकसभेत खमक्या नेत्यांअभावी एकटे पडणार असल्याचे दिसत आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदार असायला हवेत. परंतु काँग्रेस याहीवेळेला तो आकडा पार करु शकलेली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा लोकसभेला विरोधी पक्षनेत्याचे अधिकृत पद नसेल.
लोकसभेत राहुल गांधी स्वतः काही महत्वाच्या डिबेटवरच बोलायला उभे राहतात. एरव्ही सरकारला धारेवर धरण्यासाठी सभागृहात जे काम तडफेने करावे लागते, ते काँग्रेस कोणाच्या विश्वासावर करणार, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement