Bajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा
Bajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा
मी मुंबईत कॉलेजमध्ये असल्यापासून अनेक गोष्टी बघितल्या. दगडीचाळ असो किंवा इतर अनेक भागातील गुंड मी बघितले. मात्र मुंबई पोलिसांपुढे काय कुणाची हिंमत. त्या काळात दाऊदला कॉलर पकडून भेंडी बाजारमधून खेचून आणायचे. पोलीस हेच सर्वात मोठे दादा असतात, त्यांच्यापुढे कोणीही नाही. असं आमचा समज होता कालपर्यंत. मात्र आज परिस्थिती वेगळी असून वाल्मिकी कराड हा दाऊद, छोटा राजन, अमर नाईक यापेक्षा कोणी मोठा लागून गेला आहे. स्वतः चालत पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. जेव्हा की ते बापू आंधळे यांच्या हत्येच्या कटात 307 चा आरोपी आहे. पोलिसांना हे माहिती नव्हतं का?
आरोपींना आपल्या महाराष्ट्रात अशी वागणूक देणार आहात का? किंबहुना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल एक खुलासा केलाय. यात तथ्य असल्याची खात्री झाली आहे. अशी प्रतिक्रिया देत इलेक्शन फंडसाठी संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केला आहे.