एक्स्प्लोर

धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेनचा प्रवास. पहाटे 4 वाजल्यापासूनच मुंबईकरांच्या सेवेत ही लोकलसेवा सुरू होते. आजच्या पहाटे रबाळे ते घणसोली रेल्वे मार्गावर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या काही महिन्यात खून, अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वर्तमान पत्रांमध्ये दररोज वाचायला मिळत आहे. सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येवरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच, आता नवी मुंबईत चक्क एका रेल्वे (Railway) पोलीस हवालदाराचाही खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची दोघा मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपींनी त्या हवालदारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचेही आता पोलिस (Police) तपासात समोर आलं आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेनचा प्रवास. पहाटे 4 वाजल्यापासूनच मुंबईकरांच्या सेवेत ही लोकलसेवा सुरू होते. मात्र, आजच्या पहाटे रबाळे ते घणसोली रेल्वे मार्गावर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासाअंती हा मृतदेह एका रेल्वे पोलीस हवालदाराचा असल्याचं उघडकीस आलं आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मृत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहण्यास होते. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोघा व्यक्तींनी हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते. याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सदर घटनेतील मृत व्यक्ती हे पवनेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, लोकल रेल्वेसमोर टाकून देण्यापूर्वी त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे तपासातून समोर आलं आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर, चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान, अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही, पण पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, एका पोलीस हवालादाराची अशारितीने हत्या करुन मृतदेह फेकून दिल्याने पोलीस खात्यातही खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा

मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget