लोकसभेला आलेली सूज, आता उतरु लागली, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 9 पैकी 9 जागा जिंकल्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
Vidhan Parishad Election Result 2024 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार निवडून आले.
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार निवडून आले. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, भावना गवळी यांच्यासह महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. विजयानंतर महायुतीच्या आमदारांनी जल्लोष केला. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर टीका केली. लोकसभेला आलेली सूज, आता उतरु लागली, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मविआच्या आमदारांनीही मदत केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले, महायुतीसाठी आज आनंदाची गोष्ट आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकसभेला आलेली सूज, आता उतरु लागली, एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
आज महायुतीचा मोठा विजय मिळाला आहे. महायुती 9 जागा जिंकणार, असा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता. सर्व मतदारांचे, आमच्या आमदारांचे मनापासून आभार मानतो. इतर आमदारांनी आम्हाला मदत केली, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व जागा जिंकून महायुतीची चांगली सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटिव्ह पसरवला, लोकांना फसवून मतं घेतली होती. ती सूज आलेली, आता उतरु लागली आहे. महायुतीचा विजय हा त्याचं एक ट्रेलर आहे. सुरुवात चांगली झाली, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता कामाला, विकासाला आणि कल्याणकारी योजना केल्या.. त्या सर्वांना मदत करेल. येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं, सर्वसामन्यांचं सरकार येईल, असे शिंदे म्हणाले.
आजचे अधिवेशन हे या टर्मचे शेवटचं अधिवेशन होतं. दोन वर्षांत महायुतीने केलेले काम, दोन वर्षातील काम.. मविआचं अडीच वर्षांचं काम पाहिले.. आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम केलेय, असे शिंदे म्हणाले. आमच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. विरोधीपक्षनेत्यांचेही अभिनंदन करतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीची मतेही आमच्याकडे आली - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने 9 उमेदवार लढवण्यचाा निर्णय घेतला., त्यावेळी अनेकजण वल्गना करत होते. आमचे उमेदवार पडतील, आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील, आशाप्रकरे सांगितलं जात होतं. पण आज आपल्याला पाहायला मिळतेय, आम्हाला आमची मते तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतेही आमच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला मिळाला आहे. निवडून आलेल्या आमच्या नऊ सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही निवडून आलेल्या आहेत. आमचे निवडून आलेले उमेदवार सर्वसामान्य घरातील, सर्व समाजातील आणि सामान्य मानसात काम कऱणारे आमचे उमदेवार आहेत. सर्व मतदाराचे आभार मानतो. ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला, आमच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले. ही जी सुरुवात झाली आहे, ती विधानसभेच्या निवडणुकीत मोदींच्या मार्गदर्शनाखाली महायुती निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सदाभाऊ खोत जनतेचा माणूस आहे. शेतकर्यांचा नेता आहे. जनतेसाठी राबणारा नेता आहे. आमच्या महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. खोत यांच्या मतांची एकूण बेरीच 26.50 इतकी आहे. त्यांना मोठा विजय मिळाला आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोणकोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर -
2) पंकजा मुंडे -
3) परिणय फुके-
4) अमित गोरखे -
5) सदाभाऊ खोत -
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव -
शिवसेना ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर