एक्स्प्लोर

बुलडाणा विधानसभा मतदारसंघ | शिवसेनेच्या फुटीचा हर्षवर्धन सपकाळांना फायदा होणार?

गेल्या पाच वर्षांपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच जम बसवलाय. तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या विजयराज शिंदे यांचा 2014 साली त्यांनी मोठ्या मताधिक्यानं पराभव केला.

विदर्भाचं प्रवेशद्वार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यावर निसर्गानं मुक्तपणे उधळण केली आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेनं जिल्ह्याला घाटाखालचे आणि घाटावरचे अशा दोन भागात विभागलं आहे. घाटावरचा भाग सधन समजला जातो. दुसरीकडे घाटाखाली मात्र बहुतांश वेळा दुष्काळाच्या झळा तीव्र असतात. त्यामुळे भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात विषमता आढळते. बुलडाणा तालुका आणि मोताळा तालुका याचा मिळून बनलेला 'बुलडाणा विधानसभा मतदारसंघ' त्यादृष्टीनेही महत्वाचा आहे. कारण घाटाखालचे आणि घाटावरचे असा सुप्त संघर्ष या मतदारसंघाची परंपरा आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना जातीपातीचं राजकारण तर होतंच पण त्याचबरोबर उमेदवार कुठल्या भागातला आहे हे सुद्धा पाहिलं जातं.

एकूण सात मतदारसंघापैकी अत्यंत महत्वाचा आणि परिवर्तनशील नेतृत्त्व देणारा म्हणून बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात सुशिक्षित उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे देशातली तथाकथीत लाट असो किंवा त्सुनामी असो त्याचा परिणाम इथल्या मतदारांवर फारसा होत नाही. येत्या विधानसभा निवडणुका 2019 मध्येही मतदारसंघातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. कारण मतदारसंघात युतीतला संघर्ष जरी उघडउघड दिसत नसला तरी अप्रत्यक्षपणे सेना भाजपमध्ये काहीही आलबेल नसल्याचं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय.

विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळांचा तगडा जनसंपर्क

गेल्या पाच वर्षांपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच जम बसवलाय. तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या विजयराज शिंदे यांचा 2014 साली त्यांनी मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. विशेष म्हणजे तीन वेळा आमदार असूनही विजयराज शिंदे हे गेल्या निवडणुकीत थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. गेल्या निवडणुकीत सेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढली त्याचाही काँग्रेसला फायदा झाला. लोकांमध्ये थेट मिसळणं असेल किंवा अडीअडचणीत मतदारसंघातल्या लोकांच्या मदतीला धावून जाणं असेल.

हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपली स्वतःची एक सकारात्मक इमेज मतदारसंघात तयार केली आहे. शिवाय दिल्लीतही हर्षवर्धन सपकाळ यांचं वजन वाढलंय. राहुल गांधी यांनी त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केल्यानं सपकाळ यांच्याकडे जबाबदारीही वाढली आहे. गुजरात आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी चोख बजावली. त्यामुळे राहुल गांधींच्या खास मर्जीतले आणि त्यांच्या यंग ब्रिगेडचे महत्वाचे नेते म्हणूनही हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे बघितलं जातं.

दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्येही युती होईल की नाही हे स्पष्ट नाही. शिवाय युती झाली तरी ती इमानेइतबारे निभावली जाईलच याची शाश्वती सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सध्यातरी काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे.

विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

1. हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) 46985 मतं 2. संजय गायकवाड (मनसे) 35324 मतं 3. योगेंद्र गोडे (भाजप) 33237 मतं 4. विजयराज शिंदे 32946 मतं

भाजपला हवाय बुलडाणा विधानसभा मतदारसंघ जिल्ह्याचं मुख्यालय असलेला बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा आपल्याकडे हवा यासाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आपल्या वाट्याला हा मतदारसंघ यावा यासाठी भाजप लोकसभेचा तर्क लावतंय. आज शिवसेनेच्या वाट्याला असलेला बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा आधी भाजपच्या वाट्याला होता.

1996 साली माजी केंद्रीय अर्थमंत्री आनंदराव अडसुळ यांच्या आग्रहाखातर बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात आला. कारण बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून आनंदराव अडसुळ यांच्या शब्दाला तेव्हा वजन होतं. पण 1996च्या आधी हा मतदारसंघ सेनेकडे नव्हता. 1989 साली सुखदेव नंदाजी काळे हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. 1991 साली भाजपकडून पी.जी. गवई यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. पण 1996 साली तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. शिवाय 2014 साली शिवसेनेचे विजयराज शिंदे चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्यानं त्याचाही मुद्दा बनवून भाजपला विधानसभा मतदारसंघ हवा आहे.

याशिवाय जिल्हा परिषदेसह, पाच पंचायत समित्या आणि सहा पालिकांवर भाजपचं वर्चस्व असल्याने आमची ताकद जास्त असल्याचा सूर भाजपकडून काढला जातोय. भाजपकडून सध्या सातही मतदारसंघांमधल्या इच्छुकांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक अमर साबळे यांनी घेतलेल्या आहेत. त्यात बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून नऊ इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यामध्ये डॉ. योगेंद्र गोडे आणि धृपदराव सावळे यांचा समावेश आहे.

शिवसेनेत उभी फूट शिवसेनेकडून विजयराज शिंदे पुन्हा एकदा इच्छुक असले तरी 2014 निवडणुकीत मनसेकडून दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारे संजय गायकवाड हे आता शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेत सध्या उभी फूट पडली आहे.

सध्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले संजय गायकवाड यांनी तिकिटासाठी जोर लावलाय, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत हे सुद्धा तिकिटासाठी उत्सुक आहेत. पण जातीपातीच्या राजकारणात मराठा उमेदवाराला प्राधान्य दिल्यास शिवसेनेतर्फे संजय गायकवाड यांना तिकिटाची लॉटरी लागू शकते. पण युती झाली आणि गायकवाडांना तिकीट मिळालं तर भाजपकडून शिवसेनेच्या उमेदवाराला सहकार्य मिळेलच याची शाश्वती नसल्यानं त्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो.

वंचित फॅक्टरचाही प्रभाव

जिल्ह्यात वंचित फॅक्टरही आपलं अस्तित्व दाखवू शकतो. शिवसेनेनं जर विजयराज शिंदे यांना तिकीट दिलं नाही तर ते वंचितकडून तिकीट मिळवू शकतात अशी सुप्त चर्चा मतदारसंघात रंगली आहे. वंचितकडून भारिपचे जिल्हाध्यक्ष सदानंद माळी, विष्णू उबाळे आणि जितेंद्र जैन हे तिघं इच्छुक आहेत. तर एमआयएमचे मोहम्मद सज्जाद यांचीही चर्चा आहे. या सर्व उमेदवारांची ताकद मर्यादित असली तरी त्यांच्या मतांचा प्रभाव काँग्रेसच्या उमेदवारावर होणार हे नक्की.

काँग्रेसमध्येही तिकिटासाठी चढाओढ

काँग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 साली साडे अकरा हजार मतांनी विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यात मोदी लाट असूनही आपली जागा राखण्यात त्यांना यश आल्यानं ते यश महत्वाचं मानलं जातं. येत्या निवडणुकीत ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी जिल्ह्यातील इतर नेतेही काँग्रेसकडून तिकिट आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये जयश्री शेळके, संजय राठोड आणि डॉ. मधूसुदन सावळे हे नेते आपापल्या परीनं तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत.

घाटावरचा बुलडाणा तालुका आणि घाटाखालचा मोताळा तालुका या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा जनसंपर्क, लोकप्रियता आणि मतदारसंघात असलेली पकड पाहता, शिवाय हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींच्या खास मर्जीतले असल्यानं हर्षवर्धन सपकाळ यांनाच तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

बुलडाण्यातल्या समस्या सुटणार कधी?

बुलडाणा शहराकडे शासनकर्त्यांचं कायमच दुर्लक्ष झालंय. खरंतर ब्रिटिशकाळात त्याकाळचं भिल्लठाणा आणि आताचं बुलडाणा हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. सातपुड्याच्या पर्वतरांगेवर टोकावर वसलेलं हे शहर अतिशय सुंदर आणि राहण्यायोग्य आहे. जिल्ह्यातील सर्व नोकरदार आणि ज्यांना शक्य आहेत त्या सगळ्यांना बुलडाणा शहरात घर घेण्याची इच्छा असते.

सध्या बुलडाणा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात प्लॉट आणि घरांच्या किमती सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत. मतदारसंघात कुठलंही औद्योगिक धोरण नाही. कुठलाही उद्योग किंवा साधी कंपनीही बुलडाणा शहरात नसल्यानं रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे इथला सुशिक्षित तरुण पुणे आणि औरंगाबादकडे पलायन करतोय.

शहरातले रस्ते आणि मतदारसंघातल्या रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अद्यापही जैसे थेच आहे. बुलडाणा जिल्ह्यातला मतदार हा प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीवर आधारित एकही प्रकल्प जिल्ह्यात नसल्यानं आहे त्या मार्केटभावानं शेतकऱ्यांना आपला माल पडलेल्या किंमतीत विकावा लागतोय.

शेतीशी संबंधीत जोडधंदे आणि प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात नसल्यानं उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन इथल्या शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे या प्रश्नांवर निवडणूक लढणं अपेक्षित आहे. मात्र सध्यातरी मुद्द्यांवर निवडणूक न लढता राष्ट्रीय अस्मिता, जात-पात आणि गटातटावर निवडणूक लढवली जाते. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातही तेच चित्र आहे. त्यामुळे बुलडाणेकर कोणाला कौल देणार हे निकालानंतरच कळेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget