एक्स्प्लोर

ब्रह्मपुरी मतदारसंघ : 40 वर्षांपासून विरोधी पक्षाचा आमदार असलेल्या मतदारसंघात सत्ताधारी पक्ष जिंकणार?

काही लोकांचा स्वभाव हा कायम प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहण्याचा असतो. हाच स्वभाव एखाद्या मतदारसंघाचा असतो का. तर याचं उत्तर नक्कीच हो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हा असा एक मतदारसंघ आहे ज्याने कायम विरोधी पक्षाचा आमदार निवडून दिला आहे.

काही लोकांचा स्वभाव हा कायम प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहण्याचा असतो. हाच स्वभाव एखाद्या मतदारसंघाचा असतो का. तर याचं उत्तर नक्कीच हो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हा असा एक मतदारसंघ आहे ज्याने कायम विरोधी पक्षाचा आमदार निवडून दिला आहे. राज्यात ज्या पक्षाची सत्ता येणार असेल त्याच्या अगदी विरुध्द 'आमचं ठरलंय' या थाटात इथले मतदार आमदार निवडून देतात. हा किस्सा वाचायला जरी विचित्र वाटत असला तरी खरा आहे. या मतदारसंघाने गेल्या 40 वर्षांपासून कायम विरोधी पक्षाचा आमदार निवडून दिला आहे. 1980 आणि 1985 - बाबासाहेब खानोरकर (अपक्ष), 1990 च्या निवडणुकीत नामदेवराव डोनारकर (शिवसेना), 1999 च्या निवडणुकीत - उध्दवराव शिंगाडे (भाजप), 2004 आणि 2009 मध्ये अतुल देशकर (भाजप) या आमदारांच्या कार्यकाळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी चे सरकार होते. धक्कादायक म्हणजे राज्यात आतापर्यंत दोन वेळा भाजप-सेनेचे सरकार आले आणि नेमकं तेव्हाच इथे विरोधी पक्षाचे आमदार होते आणि ते म्हणजे 1995 च्या निवडणुकीत बाबासाहेब खानोरकर (जनता दल) आणि 2014 च्या निवडणुकीत - विजय वडेट्टीवार (काँग्रेस) यांना निवडून दिले आहे. ज्या पक्षाचा आमदार ब्रम्हपुरी मतदारसंघातून निवडला जाईल तो पक्ष राज्यात सत्ता मिळवणार नाही, असा जणू नियमच आहे. त्यामुळे सत्तेची उब या मतदारसंघाने कधी अनुभवलीच नाही आणि कदाचित म्हणूनच बोटावर मोजता येईल एवढ्या राईस मिल सोडल्या तर मतदारसंघात कुठलाच उद्योग नाही. मतदारसंघासाठी वरदान ठरु शकेल अशी गोसेखुर्द परियोजना अजूनही अपूर्ण आहे. कायम नुकसानीत असलेल्या धान शेतीपासून शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकांकडे वळविण्यासाठी कुठलाच प्रयत्न झालेला नाही. ब्रम्हपुरी मतदारसंघातील ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यात जंगली प्राण्यांपासून शेतीचे आणि जीविताचे होणारे नुकसान ही मोठी समस्या आहे पण सत्ताच नसल्यामुळे या प्रश्नावर सरकारकडून आश्वासनापलिकडे काहीच मिळवता आले नाही. या मतदारसंघाला 2014 मध्ये सत्तेचा मोठा वाटा मिळण्याची संधी होती. 2014 मध्ये भाजप आमदार अतुल देशकर पुन्हा निवडून येतील अशीच परिस्थिती होती. मात्र 2014 मध्ये अचानक बाजूच्या चिमूर विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली. अतिशय आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघात 13 हजारांची आघाडी घेत विजय मिळवला. खरंतर भाजप उमेदवार अतुल देशकर हे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आणि भाजप सत्तेत आली तर त्यांना मंत्रिपद मिळेल या भीतीमुळे भाजपमधल्याच काही नेत्यांनी त्यांचा घात केला अशी आजही मतदार संघात चर्चा आहे. मागील वेळी पक्षातूनच दगा-फटका झाला आणि त्यामुळेच अतुल देशकर निवडणुकीत पडले याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जान आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या सभेत आपल्याच पक्षाच्या नेत्यांना सज्जड दम भरला आणि देशकारांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपकडून माजी आमदार अतुल देशकर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असली तरी प्रणचित पोरेड्डीवार, वसंत वारजूरकर आणि संदीप गड्डमवार हेदेखील भाजप च्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पोरेड्डीवार-सावकार हे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठं प्रस्थ आहे पण जिल्ह्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा आदिवासींसाठी आरक्षित असल्यामुळे ते ब्रम्हपुरीतून उमेदवारी साठी प्रयत्न करत आहेत. संदीप गड्डमवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग मतदारसंघात आहे. गड्डमवार यांना भाजपने तिकीट नाकारल्यास ते अपक्ष उभे राहतील आणि त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस कडून विधानसभेत या वेळी पुन्हा विजय वडेट्टीवार यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. सत्तेचा नसला तरी विरोधी पक्ष नेतेपदाचा लाल दिवा मिळाल्यामुळे काही प्रमाणात विकास कामं खेचून आणण्यात त्यांना यश आलं आहे. अतिशय आक्रमक पध्दतीने प्रचारयंत्रणा राबविण्याची त्यांची शैली असली तरी यावेळी विधानसभेचा संघर्ष अतिशय चुरशीचा होणार आहे. वडेट्टीवारांच्या मतदारसंघात भाजपला 2019 च्या लोकसभेत 12 हजारांची आघाडी आहे. भाजप ला ही आघाडी मिळाली की मिळवून देण्यात आली याचा हिशेब विधानसभेत मिळणार आहे. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार हे दारूबंदीचे विरोधक असल्यामुळे त्यांना विधानसभेत पोहचू द्यायचे नाही, या ईर्ष्येने सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी या प्रचारात उतरल्या आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार हे निश्चित झालं आहे. या मतदारसंघात वंचित-बहुजन आघाडीदेखील काँग्रेस साठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या भागात आंबेडकरी आंदोलनांचा प्रमुख चेहरा अशी ओळख असलेले अशोक रामटेके यांना वंचित-बहुजन आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काँग्रेसचा हक्काचा मतदार असलेला बहुजन समाज वंचित-बहुजन आघाडीकडे वळू शकतो. विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभेची निवडणूक हाय-प्रोफाइल राहणार यात काही शंकाच नाही पण मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना दिलेला सज्जड दम, सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांची पहिली निवडणूक आणि सोबतीला संदीप गड्डमवार आणि वंचित-बहुजन आघाडी यांचे उपद्रवमूल्य या फॅक्टरमुळे ही निवडणूक मोठी रंजक होणार आहे. सोबतच ब्रम्हपुरी मतदारसंघाच्या नशिबी गेल्या 40 वर्षांपासून असलेला सत्तेचा वनवास संपेल का? याचेदेखील उत्तर निकालानंतर मिळणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी विजय वडेट्टीवार - काँग्रेस - 70,228 मतं (13,772 मतांची आघाडी) अतुल देशकर - भाजप - 56,456 मतं संदीप गड्डमवार - राष्ट्रवादी काँग्रेस - 44,669 मतं योगीराज कुथे - बसपा - 7,575 मतं लोकसभा 2019 मधील मतदानाची आकडेवारी अशोक नेते - भाजप - 89,361 मतं (12,512 मतांची आघाडी) डॉ. नामदेव उसेंडी - काँग्रेस - 76,849 मतं डॉ. रमेश कुमार गजबे - वंचित बहुजन आघाडी - 27,283 मतं
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget