BJP on Nawab Malik : सना मलिकांना सपोर्ट, पण नवाब मलिकांना विरोध;आशिष शेलारांनी भाजपची स्ट्रॅटेजी सांगितली
BJP on Nawab Malik, Mumbai : माजी नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केली आहे.
BJP on Nawab Malik, Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झाले असून सर्व जागांवर उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी यावेळी भाजपसोबत निवडणुकीला सामोरे जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मंत्री मंत्री नवाब मलिक माणखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवार यांनी तिकीट दिलं आहे. मात्र, महायुतीमधूनच नवाब मलिक यांना विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे भाजपने स्पष्ट केलं आहे. मात्र, दुसरीकडे सना मलिक यांना अनुशक्तीनगरमध्ये पाठिंबा देण्यात आला आहे.
दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीचा प्रचार करणार नाही
'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही', असा पुनरुच्चार मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार शेलार म्हणाले, 'भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही', असे आशिष शेलार म्हणाले.
सना मलिकांचे यांच्याविरोधात प्रचार करणार का?
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या